VIDEO : चालत्या गाडीने पेट घेतला, सुदैवाने कुटुंब बचावले, मुंबई-नाशिक महामार्गावरील थरकाप उडवणारा व्हिडीओ

या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने गाडीतील सर्वजण बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता

  • सुनिल घरत, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 16:55 PM, 21 Dec 2020
VIDEO : चालत्या गाडीने पेट घेतला, सुदैवाने कुटुंब बचावले, मुंबई-नाशिक महामार्गावरील थरकाप उडवणारा व्हिडीओ

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर कानविंदे फाट्याजवळ चालत्या सेलेरो गाडीने पेट घेतला (Mumbai-Nashik Highway Car Burned). या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने गाडीतील सर्वजण बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता (Mumbai-Nashik Highway Car Burned).

नाशिक येथील एक कुटुंब कल्याण येथून लग्न समारंभ उरकून आपल्या सेलेरो गाडीने आपल्या घरी नाशिककडे निघाले होते. आज (21 डिसेंबर) सकाली 11 वाजून 40 मिनिटांनी मुंबई-नाशिक महामार्गवर शहापूर येथील कानविंदे फाट्यावर सेलेरो गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपली गाडी कानविंदे फाटा येथे रस्त्याच्या बाजूला लावली आणि गाडीमधील आपल्या कुटुंबाला गाडीच्या बाहेर उतरवलं. काहीच वेळात बघता-बघता डोळ्यासमोर संपूर्ण गाडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट झाल्याने गाडी जळल्याचा अंदाज गाडी चालकाने व्यक्त केला.

गाडीमध्ये 3 लहान मुलं, 3 महिला आणि 2 पुरुष असे गाडी चालकासह एकूण 8 जण होते. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची इजा झाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सध्या सर्वजण सुखरुप आहेत (Mumbai-Nashik Highway Car Burned).

घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहापूर महामार्ग पोलीस पोहचले. त्यानंतर त्यांनी स्थानिक पण्याचा टँकर बोलावून पेट घेतलेली गाडी विझवण्यात आली. मात्र. गाडी पूर्णपणे जळाली असून गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. त्या गाडी मालकाचे 100% नुकसान झाले आहे.

पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ – 

Mumbai-Nashik Highway Car Burned

संबंधित बातम्या :

डोंबिवली एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, सहा कोटींचा माल जळून खाक

Fire | हैदराबादमध्ये केमिकल फॅक्टरीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट, भीषण आगीत अनेक जण जखमी

खंबाटकी घाटात कारने अचानक घेतला पेट, भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक