AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी दुर्घटना, 48 विद्यार्थ्यांना घेऊन क्लासची पिकनीक निघाली, परतताना बोरघाटात काळाचा घाला

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात एक मोठी आणि भीषण अपघाताची दुर्घटना घडलीय.

मोठी दुर्घटना, 48 विद्यार्थ्यांना घेऊन क्लासची पिकनीक निघाली, परतताना बोरघाटात काळाचा घाला
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 11, 2022 | 9:52 PM
Share

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात एक मोठी आणि भीषण अपघाताची दुर्घटना घडलीय. चेंबूर येथून 48 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. एका खासगी क्लासचे विद्यार्थी या बसने प्रवास करत होते. बसमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. आपल्यासोबत काही विपरीत घडेल याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. अभ्यासापासून थोडं दूर, विरंगळा काढून, आयुष्य मस्त मजेत जगावं असा विचार करुन ते सहलीला गेले होते. पण त्यांच्यावर वाटेत काळाने घाला घातला. तब्बल 48 विद्यार्थ्यांनी भरलेली बस बोरघाटात पलटी झाली आणि हाहाकार उडाला.

मुंबईच्या चेंबूर येथून ही बस मावळसाठी निघाली होती. ही बस मावळ येथील ‘वेट न जॉय’ या थीम पार्कमध्ये गेली होती. मावळ येथून परतत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या अपघातामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडालीय.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय. प्रशासनाकडून सर्व जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येतंय. या संकटापासून सर्व विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका व्हावी यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विध्यार्थ्यांना खोपोलीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खोपोली पोलीस, IRB यंत्रणा ही सर्व टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी काम करत आहे.

दरम्यान, या घटनेत आतापर्यंत किती विद्यार्थी जखमी झालेत याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.