गोवा-मुंबई महामार्गावर दोन कार समोरासमोर धडकल्या; लहान मुलं गंभीर; कार उलट्या दिशेला फिरल्या

| Updated on: Aug 04, 2022 | 5:06 PM

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यामुळे काही वेळ येथील वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावरील अपघातग्रस्त दोन्ही कार बाजूला काढल्यानंतर येथील वाहतूक विभागाकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दोन कार समोरासमोर धडकल्याने या कारचा जोरात आवाज झाला होता.

गोवा-मुंबई महामार्गावर दोन कार समोरासमोर धडकल्या; लहान मुलं गंभीर; कार उलट्या दिशेला फिरल्या
Image Credit source: TV9
Follow us on

महाडः मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) महाडजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात दोन कारची (Car Accident) एकमेकांना जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 2 लहान मुलांसह 4 जण जखमी (Two Baby Injured) झाले आहेत. गुजरातहून रत्नागिरीकडे जाणारी कार व कुसगावहून महाडकडे येणारी कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर परिसरात कारच्या धडकेमुळे जोरात आवाज झाला, त्यामुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतीचा हात दिला

समोरासमोर दोन कार धडकल्या

मुंबई-गोवा महामार्गावर या दोन्ही कार समोरासमोरुन येत असताना प्रचंड वेगात होत्या, तरीही त्यांचा अपघात झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ज्यावेळी या कार एकमेकांना धडकल्या त्यावेळी कुसुगावहून महाडकडे येणाऱ्या कारची दिशा बदलली होती, इतकी जोरात ही धडक बसली होती.

महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाल्यामुळे काही वेळ येथील वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावरील अपघातग्रस्त दोन्ही कार बाजूला काढल्यानंतर येथील वाहतूक विभागाकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दोन कार समोरासमोर धडकल्याने या कारचा जोरात आवाज झाला होता.

दोन लहान मुलं गंभीर

त्यामुळे परिसातील नागरिकांनी अपघातग्रस्त कारकडे धाव घेतली. अपघातात दोन लहान मुलं गंभीर जखमी झाल्याने त्यानंतर त्यांना तात्कार पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.