AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेत पाच संघांकडून खेळले पाकिस्तानी खेळाडू, बंदीनंतरही अझहर महमूदला घेतलं; कारण..

इंग्लंडमधील द हंड्रेड लीग स्पर्धेत काव्या मारनच्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतलं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. यापूर्वी एक वेळ अशी होती की आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळले आहेत. चला जाणून घेऊयात...

आयपीएल स्पर्धेत पाच संघांकडून खेळले पाकिस्तानी खेळाडू, बंदीनंतरही अझहर महमूदला घेतलं; कारण..
आयपीएल स्पर्धेत पाच संघांकडून खेळले पाकिस्तानी खेळाडू, बंदीनंतरही अझहर महमूदला घेतलं; कारण..Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 13, 2026 | 5:50 PM
Share

इंग्लंडच्या द हंड्रेड 2026 लीग स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्स संघाने अबरार अहमदला विकत घेतलं. त्यासाठी 1.90 लाख पाउंड मोजले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाच्या खेळाडूला घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय तर आयसीसी स्पर्धेत हातही मिळवत नाही. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानी मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानवर किती राग आहे हे दिसून येतं. पण जेव्हा भारत पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध होते तेव्हा आयपीएलच्या पाच फ्रेंचायझीकडून पाकिस्तानी खेळाडू खेळले आहेत.

आयपीएलच्या पहिल्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून 4 पाकिस्तानी खेळाडू खेळले आहे. सौरव गांगुलीकडे कर्णधारपद होतं आणि या संघात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर होता. तसेच सलमान बट, उमर गुल आणि मोहम्मद हाफीज हे खेळाडू होते. आयपीएलच्या पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्स संघात पाकिस्ताने 3 खेळाडू खेळले आहेत. यात सोहेल तनवीर, विकेटकीपर उमरान अकमल आणि दिग्गज फलंदाज यूनिस खान यांचा समावेश आहे. तनवीर या पर्वात पर्पल कॅप मिळाली होती. तसेच राजस्थान रॉयल्स चॅम्पियन ठरला होता.

पाकिस्तानचा अष्टपैलू आणि विस्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीला हैदराबादचा जुना संघ डेक्कन चार्जर्सने विकत घेतलं होतं. या संघात एडम गिलख्रिस्ट, अँड्रू सायमंड आणि हर्षल गिब्ससारखे आक्रमक फलंदाज होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही पहिल्या पर्वात पाकिस्तानचा एक खेळाडू घेतला होता. मिस्बाह उल हकला संघात स्थान दिलं होतं.

किंग्स इलेव्हन पंजाब आणि आताच्या पंजाब किंग्स संघाने पहिल्या पर्वात तर पाकिस्तानी खेळाडू घेतला नाही. पण पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातल्यानंतर तीन वर्षांनी अष्टपैलू अझहर महमूदला घेतलं. पण तेव्हा महमूदने पाकिस्तान सोडला होता आणि इंग्लंडची नागरिकता घेतली होती. त्यामुळे त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. महमूद 2012 आणि 2013 मध्ये पंजाबकडून खेळला. त्यानंतर 2015 मध्ये कोलकाता संघाकडून खेळला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल