आता वसईवरून ट्रेनने गाठा कोकण ! १ मे पासून विशेष गाडी

| Updated on: Apr 24, 2022 | 1:10 PM

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संपूर्ण 741 किमी मार्ग नेटवर्कसह, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील गाड्या चालवल्या जाणार आहेत. महामंडळाने 28 मार्च रोजी इलेक्ट्रिक लोको-होल्ड कोचिंग चालविण्याचा निर्णय घेतला होता. ट्रेन 1 मे पासून टप्प्याटप्प्याने चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे

आता वसईवरून ट्रेनने गाठा कोकण ! १ मे पासून विशेष गाडी
आता वसईवरून ट्रेनने गाठा कोकण! १ मे पासून विशेष गाडी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – वसईतून (Vasai) आता कोकणातला (kokan) तुमचा प्रवास आता एकदम सुसाट होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरीत विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. सुरूवातीला या मार्गावर फक्त दोन गाड्या धावत होत्या. आता या मार्गावर विजेवर धावणाऱ्या गाड्यांची भर पडणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर दहा एक्सप्रेस गाड़्या धावणार आहेत. सर्व गाड्या लांब पल्ल्याच्या असतील. तसेच त्यामुळे रेल्वेचा प्रदुषणमुक्त रेल्वेचा (Kokan Railway) प्रवास होणार आहे.

१ मे पासून विशेष गाडी

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संपूर्ण 741 किमी मार्ग नेटवर्कसह, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील गाड्या चालवल्या जाणार आहेत. महामंडळाने 28 मार्च रोजी इलेक्ट्रिक लोको-होल्ड कोचिंग चालविण्याचा निर्णय घेतला होता. ट्रेन 1 मे पासून टप्प्याटप्प्याने चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या शेजारच्या भागातून इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर प्रवासी गाड्यांच्या 10 जोड्या प्राप्त होतील. 10 पैकी, सहा जोड्या मंगळुरु जंक्शनमधून जातात आणि त्यापैकी तीन मंगळुरु सेंट्रल/जंक्शन येथे थांबतील अशी माहिती मिळाली आहे.

कर्नाटक किनारपट्टीवर धावणाऱ्या सहा जोड्या

कर्नाटक किनारपट्टीवर धावणाऱ्या सहा जोड्यांमध्ये ट्रेन मुंबई एलटीटी-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा समावेश आहे.मुंबई सीएसएमटी-मंगळुरु जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम-मुंबई एलटीटी-थिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, मंगळुरु सेंट्रल-मडगाव-मंगळुरु सेंट्रल पॅसेंजर स्पेशल आणि तिरुवनंतपुरम-निरुवनंतपुरम-राजापूरम-राजापुरम एक्स्प्रेस अशा जोड्या आहेत.

ओपन वाल्यांपेक्षा एससी-एसटी, ओबीसी जातीतील लोकं 4 ते 6 वर्ष कमी जगतात- सर्वेक्षण

Thane: माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध करणारी घटना! गरोदर असलेल्या जखमी गाईचं संवेदनशील कुटुंबाकडून बाळंतपण

Loadshedding : लोडशेडिंग टाळण्यासाठी महावितरणचा मेगाप्लॅन; वॉर रूम सुरू, प्रत्येक तासाला आढावा