AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओपन वाल्यांपेक्षा एससी-एसटी, ओबीसी जातीतील लोकं 4 ते 6 वर्ष कमी जगतात- सर्वेक्षण

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनं अभ्यासात आपली निरीक्षणं नोंदवली आहेत.

ओपन वाल्यांपेक्षा एससी-एसटी, ओबीसी जातीतील लोकं 4 ते 6 वर्ष कमी जगतात- सर्वेक्षण
कोणत्या जातीत किती वय?Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 24, 2022 | 12:47 PM
Share

मुंबई : भारतात (India cast and religion) जात, धर्म, पंथ या गोष्टी आहेतच. राजकारण (Cast politics in India) तर या गोष्टींचा अनुभव वेळोवेळी येत राहतोच. मात्र भारतीयांच्या आयुष्यावरही जातीचं पडगा असू शकतो? कोणत्या जातीतला माणूस किती वर्ष जगतो? असं वर्गीकरण करता येऊ शकतं का? असा प्रश्न कुणी विचारला तर वावगं ठरु नये! नुकत्याच हाती आलेल्या एका रिपोर्टनुसार, जातींप्रमाणे लोकांचं आयुष्य किती आहे? कोणत्या जातीतली लोकं किती वर्ष जगतात? (Life expectancy) याचा अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणानं नोंदवलेलं निरीक्षण चर्चेचा विषय ठरु शकतं. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. अनुसूचित जाती आण अनुसूचित जमातींमधील महिला आणि पुरुषांपेक्षा उच्च जाती-श्रेणीतील लोकांचं वय हे जास्त असल्याचं या रिपोर्टमधून सांगण्यात आलंय. उच्च जातीतील लोकांचं सरासरी वय हे एससी, एसटी आणि ओबीसी जातीतील लोकांपेक्षा चार ते सहा वर्ष जास्त असतं, असं सांगण्यात आलं आहे.

कुणी केलंय सर्वेक्षण?

जी आकडेवारी जातीनिहाय आर्युमानाबाबत जारी करण्यात आली आहे, त्यावरुन सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे हे सर्वेक्षण केलंय कुणी? तर याचं उत्तरही समोर आलंय. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनं अभ्यासात आपली निरीक्षणं नोंदवली आहेत. या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील तपशील सविस्तपणे मांडण्यात आलेत. पॉप्युलेशन एन्ड डेव्हल्पमेन्ट रिव्ह्यूमध्ये या सर्वेक्षणातील निरीक्षणं नोंदवण्यात आली.

थोडक्यात, पण महत्त्वाचं

  1. सर्वसाधारणपणे उच्च जातीसह अनुसूचित जातीतील पुरुषांचं वय 4.6 वरुन 6.1 वर्षांपर्यंत वाढलंय.
  2. सवर्ण पुरुष आणि मुस्लिम पुरुषांमधील अंतर 0.3 वर्षांवरुन 2.6 वर्षांवर गेलंय.
  3. सवर्ण आणि मुस्लिम महिलांमधील अंतर 2.1 ते 2.8 वर्ष इतकं झालंय.
  4. उच्चवर्णीय जातीतील महिलांच्या वयात आणि मुस्लिमांसह एससी, एसटी आणि ओबीसी जातीतील महिलांच्या सरासरी वयातील अंतर फारसं नाही.
  5. मात्र उच्चवर्णीय जातीतील पुरुषांचं वय हे मुस्लिम पुरुषांसोबत ओबीसी आणि इतर जातीतील पुरुषांच्या वयाच्या तुलनेत जास्त आहेत.
  6. शेड्यूल ट्राईब पुरुषांपेक्षा उच्च वर्णीय जातीतील पुरुषांचं वय हे 8.4 वर्षांपेक्षा अधिक आहे. गेली सात वर्ष हे प्रमाण कमी न झाल्याचंही सांगितलं जातंय.

महत्त्वपूर्ण आकडेवारी

  1. उच्चवर्णिय जातीतील महिला 1997-2000 – 64.3 वर्ष 2013-16 – 72.2वर्ष
  2. मुस्लिम महिला सरासरी वय – 1997-2000 – 62.2 वर्ष 2013-16 – 69.4वर्ष
  3. ओबीसी महिला सरासरी वय – 1997-2000 – 60.7वर्ष 2013-16 – 69.4वर्ष
  4. एससी महिला सरासरी वय – 1997-2000 – 58 वर्ष 2013-16 – 67.8वर्ष
  5. एसटी महिला सरासरी वय – 1997-2000 – 57 वर्ष 2013-16 – 68 वर्ष
  6. उच्चवर्णिय जातीतील पुरुष 1997-2000 – 62.9 वर्ष 2013-16 -69.4 वर्ष
  7. मुस्लिम पुरुष सरासरी वय – 1997-2000 – 62.6 वर्ष 2013-16 – 66.8वर्ष
  8. ओबीसी पुरुष सरासरी वय – 1997-2000 – 60.2 वर्ष 2013-16 – 66 वर्ष
  9. एससी पुरुष सरासरी वय – 1997-2000 – 58.3 वर्ष 2013-16 – 63.3वर्ष
  10. एसटी पुरुष सरासरी वय – 1997-2000 – 54.5 वर्ष 2013-16 – 62.4 वर्ष

छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.