AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा, खोचक शब्दांमध्ये टीका

उद्धव ठाकरे यांनी आज रायगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यांनी शिर्डीत आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पण महाराष्ट्रात सध्या ज्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे त्या मराठा आरक्षणावर मोदी काहीच बोलले नाहीत. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा, खोचक शब्दांमध्ये टीका
| Updated on: Oct 27, 2023 | 5:08 PM
Share

रायगड | 27 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे आज रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीच्या निमित्ताने आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पार पडलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी काल शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्ये केलं. पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलायचं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“व्यासपीठावर मी शिवसेनेकडून आहे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून आहेत. जयंत पाटील शेकाप पक्षाकडून आहेत. शिवसेना आणि शेकाप पक्षाच्या एकेकाळी अगदी मारामाऱ्या झाल्या आहेत. चॅलेंज दिले आहेत. येऊन दाखवा, असे चॅलेंज दिले आहेत. हे सगळं झालं आहे. एवढी वर्ष गेल्यानंतरसुद्धा आम्ही एका व्यासपीठावर येऊ शकलो आणि आलो याचं कारण असं की, त्या सर्व मारामाऱ्या आणि विरोध व्यक्तीगत नव्हता”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

‘विरोधक असतील तर संपवू, पण सोबत असतील त्याला सुद्धा संपव’

“सूडाचं राजकारण कुणीच केलं नाही. म्हणजे शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. तशी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री उघड होती. उघड पाठिंबा दिला होता. पण जिथे मतं पटायची नाहीत तिथे मताला विरोध केला जायचा. आताचं जे सुरु आहे, विरोधक असतील तर संपवू, पण सोबत असतील त्याला सुद्धा संपव. हे समीकरण मी करणाचं चालू आहे. माझ्याशिवाय कुणीच नको”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन मोदींवर निशाणा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी कालसुद्धा महाराष्ट्रात येऊन गेले. शिर्डीला गेले. मला खरी अपेक्षा अशी होती की, ते आता जो प्रश्न आरक्षणाचा प्रश्न धुमसतोय, त्या आरक्षणावर ते काही बोलतील. कारण हा त्यांच्या अखत्यारितला प्रश्न आहे. पण ते आरक्षणावर काहीच बोलले नाहीत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जो काही ज्वलंत प्रश्न आहे त्यावर बोलायचं नाही. मणिपूर पेटतंय. पण बोलायचं नाही. आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत, आत्महत्या करत आहेत. पण बोलायचं नाही. जणू मी त्या गावचाच नाही, असं बोलून निघून जायचं”, अशी टीका ठाकरेंनी केली.

“पवार साहेब एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल काल त्यांनी 70 हजार कोटींचा उल्लेख केला नाही. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची टीका केली होती. पण बाजूला कोण बसलं होतं?, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “हे जे काही थोतांड चालू आहे ते सर्वजण बघत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘देशात पहिल्यांदा कर्जमाफी शरद पवारांनी केली’

“त्यांनी कुठून काढलं की, शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही. त्यावेळी शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. ए. आर. अंतुले यांच्यावेळी तर मी लहान होतो. पण मला जे आठवतंय, मनमोहन सिंह पंतप्रधान होते. शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा पहिल्यांदा देशात 70 हजार कोटींची कर्जमाफी शरद पवारांनी केली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘जणू नळाला पाणीसुद्धा आताच येतंय’

“जणू काही आजपर्यंत कोण झालेलंच नाही. जे काही होतंय ते मी आल्यानंतर होतंय. नळाला पाणीसुद्धा आताच येतंय. गंगा नदीसुद्धा आताच अवतरली आहे. असा काही अभास निर्माण केला जातोय. लोकं एवढी मुर्ख नाहीत. सूडाने राजकारण करायचं. शेतकऱ्यांचा आसूड कडाडला की भलेभले झोपून जातात. तिकडे कुणाचं चालत नाही. सर्वसामान्यांच्या ताकदीपुढे भल्याभल्यांना झुकावं लागतं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.