मोठी बातमी! ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर येणार? नेमकं कारण काय?

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा रंगलेली आहे. अशातच आता हे दोन्ही नेते उद्या म्हणजेच सोमवारी (22 सप्टेंबर) पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर येणार? नेमकं कारण काय?
| Updated on: Sep 21, 2025 | 10:20 PM

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा रंगलेली आहे. याआधी अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसलेले आहेत. अशातच आता हे दोन्ही नेते उद्या म्हणजेच सोमवारी (22 सप्टेंबर) पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते नेमक्या कोणत्या कारणामुळे एकत्र येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्याच्या नुतणीकरण करण्यात आलेल्या वास्तूचं उद्या उद्घाटन होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचा शुभारंभ होणार आहे. उद्या म्हणजेच 22 सप्टेंबरला होणाऱ्या या उद्घाटन कार्यकर्माचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उद्या दोन्ही नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे उपस्थित राहणार आहे, मात्र उद्धव ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत.

दोन्ही पक्षांमध्ये युती होणार?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष युती करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून रंगलेली आहे. मात्र अद्याप या युतीचा कोणताही निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी या युतीची इच्छा व्यक्त केलेली आहे, तसेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना एकत्र काही मोर्चांमध्येही सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन होण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली आहे. मात्र या युतीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला सुरुवात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांनी वार्डप्रमुखांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांमध्ये आगामी निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असेल याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.