AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: गणेशोत्सवात दंगल घडवणार? राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा, कुणावर निशाणा?

Raj Thackeray on Riots: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. गणेशोत्सवात काय घडणार याविषयी त्यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या माध्यमातून कुणावर निशाणा साधला आहे?

Raj Thackeray: गणेशोत्सवात दंगल घडवणार? राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा, कुणावर निशाणा?
राज ठाकरे यांचा घणाघात
| Updated on: Sep 06, 2026 | 12:21 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक खळबळजनक दावा केला आहे. गणेशोत्सवात दंगल घडवण्यात येणार असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील प्रश्नांना बगल देण्यासाठी दंगली घडवण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण भाजपमधील लोक त्यावर बोलू शकत नाहीत, असे ते म्हणाले. या राज्याचे नागरीक म्हणून तुम्ही सतर्क राहा. जाणीवपूर्वक ते हे करतील, तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आज 6 सप्टेंबर 2026 रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी देशातील विविध प्रश्नांवर मोठे भाष्य केले. त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी यावेळी राज्यात दंगलीचे षडयंत्र घडवण्याचा डाव असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव

“तुम्हाला मु्द्दाम गुंतवून ठेवले जात आहे. सोशल मीडियावर पण हा मुद्दा चर्चेत आहे. आता गणपती येतील. 14 तारखेला गणपती येतील. मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही म्हणत मी, देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचं इतर गोष्टीकडं दुर्लक्ष झालं पाहिजे. आताच मुंबईत त्याची झलक पाहिली तुम्ही.एक दोन घटना घडल्या, ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू आहे. जो सुजाण मुस्लिम आहे. दोघांनाही सांगायचंय की सतर्क राहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने यामध्ये कुणीतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. हकनाक आपली पोरं जातील, त्यांची पोरं जातील. तिकडेच लक्ष जाईल तुमचं. एक दुसऱ्याचा दुस्वास करणे आणि त्यात गुंतवून ठेवणे, मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे इतकाच कार्यक्रम आता सुरू आहे. आता देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.” असे मोठा दावा राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून केला.

मराठी-हिंदी वादावर काय आवाहन?

तर मराठी शिकण्याच्या मुद्दावर अमराठी भाषिकांना मुद्दामहून डिवचणारे वक्तव्य करायला लावले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. हे मराठी लोक काय उखडतील? मराठी नाही बोलणार. हे बोलायला लावतायेत जेणेकरून तुम्ही त्यात अडकाल. आता नवी मुंबईत हिंदी भाषिक संमेलन होत आहे. अमित शाह वैगरे येणार आहेत तिथे. लगेच बातम्या सुरू झाल्या. महाराष्ट्रात हिंदी संमेलन होत असल्याचा बातम्या आल्या. हे संमेलन होऊन जाऊ द्या. दुर्लक्ष करा त्या गोष्टीकडे. हिंदी संमेलनाला येऊन सुद्धा अमित शाह यांचं हिंदी चांगलं नाही होऊ शकत. कारण तेही परेस, जयेस वालेच आहेत, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला. या वादात न अडकण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?