Raj Thackeray: गणेशोत्सवात दंगल घडवणार? राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा, कुणावर निशाणा?

Raj Thackeray on Riots: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. गणेशोत्सवात काय घडणार याविषयी त्यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी या माध्यमातून कुणावर निशाणा साधला आहे?

Raj Thackeray: गणेशोत्सवात दंगल घडवणार? राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा, कुणावर निशाणा?
राज ठाकरे यांचा घणाघात
| Updated on: Sep 06, 2026 | 12:14 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक खळबळजनक दावा केला आहे. गणेशोत्सवात दंगल घडवण्यात येणार असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील प्रश्नांना बगल देण्यासाठी दंगली घडवण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पण भाजपमधील लोक त्यावर बोलू शकत नाहीत, असे ते म्हणाले. या राज्याचे नागरीक म्हणून तुम्ही सतर्क राहा. जाणीवपूर्वक ते हे करतील, तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आज 6 सप्टेंबर 2026 रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी देशातील विविध प्रश्नांवर मोठे भाष्य केले. त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी यावेळी राज्यात दंगलीचे षडयंत्र घडवण्याचा डाव असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव

“तुम्हाला मु्द्दाम गुंतवून ठेवले जात आहे. सोशल मीडियावर पण हा मुद्दा चर्चेत आहे. आता गणपती येतील. 14 तारखेला गणपती येतील. मला सर्वाधिक भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. केवळ महाराष्ट्रात नाही म्हणत मी, देशात दंगली घडवल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्यात अडकले पाहिजे, तुमचं इतर गोष्टीकडं दुर्लक्ष झालं पाहिजे. आताच मुंबईत त्याची झलक पाहिली तुम्ही.एक दोन घटना घडल्या, ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू आहे. जो सुजाण मुस्लिम आहे. दोघांनाही सांगायचंय की सतर्क राहा. आपल्या नावाने, त्यांच्या नावाने यामध्ये कुणीतरी घुसवतील आणि दंगली घडवतील. हकनाक आपली पोरं जातील, त्यांची पोरं जातील. तिकडेच लक्ष जाईल तुमचं. एक दुसऱ्याचा दुस्वास करणे आणि त्यात गुंतवून ठेवणे, मूळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे इतकाच कार्यक्रम आता सुरू आहे. आता देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे.” असे मोठा दावा राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून केला.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us