राज ठाकरेंकडून मिमिक्री, अजित दादांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले, माझ्या अंगाला भोकं…

Ajit Pawar Give Reply to Raj Thackeray: आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री केली होती. यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राज ठाकरेंकडून मिमिक्री, अजित दादांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले, माझ्या अंगाला भोकं...
Ajit Pawar and Raj Thackeray
| Updated on: Oct 15, 2025 | 8:12 PM

राज्यातील राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. आज महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आणि राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यात बैठकी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी, मतदार यादीतील गोंधळ याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री केली होती. यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राज ठाकरेंनी केली अजित पवारांची मिमिक्री

पत्रकार परिषदेच्या शेवटी राज ठाकरे यांना, ‘तुम्ही आजकाल महाविकास आघाडीसोबत दिसता असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मी 2017 ला देखील दिसलो होतो. तुमच्या लक्षात असेल कदाचित त्यावेळच्या पत्रकार परिषदेवेळी मी हेच बोलत होतो. त्यावेळी अजित पवार देखील होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. (हे वाक्य अजित दादांच्या स्टाईलमध्ये बोलले) त्यावेळी ते सगळ्या गोष्टी सांगत पण होते.’

अजित दादांनी दिले प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या या मिमिक्रीवर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्हीही उद्या माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. कोणी मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील मी काम करत राहील. मी आज माझ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिमिक्री कोण करतयं हे आपण ओळखलं पाहिजे. पूरग्रस्तांना मदत कशी द्यायची, शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत मदत पोहोचवणे हे माझं टार्गेट आहे.

बिबट्यांच्या संख्येबाबत भाष्य

पुणे आणि अहिल्यानगरमधील खेडेगावात बिबट्यांची संख्या वाढली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘बिबट्यांची संख्या कमी जास्त सागितली जात आहे. नसबंदी करायची, सव्वाशे बिबटे एके ठिकाणी बंदिस्त करायचे, वनातारा कडे काही द्यायचे चालले आहे. बिबट्या ऊसामध्ये राहतात त्यामुळे त्याचा जंगलात संबंध राहिला नाही. ते कुत्री मांजर कोंबड्या खातात. त्याच्यासाठी आम्ही आता वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहे, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, आता दौंड पर्यंत बिबटे पोहोचले आहेत.’