Raj Thackeray : लक्षात ठेवा, तुम्ही अमरपट्टा घेऊन आला नाही.. राज ठाकरेंची सरकारवर थेट टीका..
नुकताच मनसे नेते राज ठाकरे यांनी जोरदार टीका भाजपावर केली. यावेळी त्यांनी मिसिंग लिंकवर पडलेल्या दरडेवर भाष्य केले. यासोबतच त्यांनी याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

आज मनसे रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन आहे. दादरच्या सावरकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार टीका भाजपावर केली. हेच नाही तर त्यांनी सरकारचा जोरदार समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका करताना राज ठाकरे दिसले. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषावरही बोट ठेवले. मिसिंग लिंकच्या मुद्द्यात त्यांनी टीका केली. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी हिंदीमध्ये केलेल्या भाषणावरून त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी म्हटले की, आता केंद्राची कामे आहे. त्याचा देशाचा काय संबंध. मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही ना. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मिसिंग लिंकचं झालं. भाजपचे लोक म्हणतात नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात राजकारण आणू नका. लक्षात ठेवा. तुम्ही अमरपट्टा घेऊन आला नाही. उद्या कुणी असं केलं तर नैसर्गिक गोष्ट आहे असंच सांगा. लोकांना सांगा. झाड पडून मुलगा जातो. माणूस जातो. मुलगा गटारात पडतो. म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार असल्यावर नैसर्गिक.
इतरांचं असल्यावर राजकारण करणार. मिसिंग लिंकवर नशीब माणसं नाही मेली. मागे मुंबई तुंबली. 1000 मिलिमिटर पाऊस पडला होता. तेव्हा मुंबईची हालत झाली होती. आता 300 ते 350 मिलिलिटर पाऊस पडला. मुंबई तशीच. तुंबलेली. तेव्हा वारेमाप आंदोलन करायचे. आरोप करायचे.
कोण ती बाई, गाण म्हणायची. मुंबईवर भरोसा नाही का. कुठे गेली ती आता. आला का तिचा व्हिडिओ. नवीन आहे का की जुना टाकलाय. नवीन असेल तर चांगलं. जेव्हा ती गात होती. तेव्हा सुख घेतलं. आता दुसरे बोलायला लागले तर त्रास व्हायला लागला. राज ठाकरे यांनी मिसिंग लिंकच्या झालेल्या अवस्थेवरून सरकारला जोरदार टार्गेट केले.