5

देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल सांगितलं होतं, ते आज होतंय : राज ठाकरे

नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात रणशिंग फुंकलंय. यासाठी एकही उमेदवार उभा न करता ते राज्यभर सभा घेत आहेत. यातील पहिली सभा नांदेडमध्ये झाली. या देशातून मोदी आणि शाह हे नाव घालवणं गरजेचं आहे, असं म्हणत भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मोदी जाईन तिथे सभा घेतात, पण कधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबाबत, तरुणांबाबत […]

देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल सांगितलं होतं, ते आज होतंय : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात रणशिंग फुंकलंय. यासाठी एकही उमेदवार उभा न करता ते राज्यभर सभा घेत आहेत. यातील पहिली सभा नांदेडमध्ये झाली. या देशातून मोदी आणि शाह हे नाव घालवणं गरजेचं आहे, असं म्हणत भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मोदी जाईन तिथे सभा घेतात, पण कधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबाबत, तरुणांबाबत बोलले का, असा सवालही राज ठाकरेंनी केला.

पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पुलवामातील शहीद जवानांच्या नावे मतं मागतायेत, ते काय निवडणुकीला उभे आहेत का? अभिनंदन निवडणुकीला उभा आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले देशाची सेना ही म्हणे मोदींची सेना आहे. मोदींनी नव-मतदारांना आवाहन केलं की तुमचं पहिलं मत हे बालाकोटचा एअरस्ट्राईक करणाऱ्या सैन्यासाठी, पुलवामाच्या वीर शहिदांसाठी द्या. जवानांच्या नावावर मतं मागताना लाज नाही वाटत?, असंही राज ठाकरे म्हणाले.

बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडेही नाही. पण अमित शाह म्हणाले 250 दहशतवादी मारली गेली. अमित शाहांना कुठून मिळाला हा आकडा? मोदींनी युद्धसदृश्य स्थिती निर्माण केली, आमच्या देशाच्या सैन्यांवर आमचा विश्वास आहे. मी 4 वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय, असं म्हणत त्यांनी मोदींवर गंभीर आरोप केला.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. बसवलेला मुख्यमंत्री कधीच काही बोलू शकत नाही, स्वतःच्या हिंमतीवर बसलेला मुख्यमंत्री बोलू शकतो, आज आपल्या महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं जातंय, पण देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलू शकत नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.

लाईव्ह अपडेट :

 • बीडमध्ये महिलांची गर्भाशयं काढून विकली जात असल्याचा प्रकार समोर आलाय, टोळी पकडली गेली, मग हा चौकीदार नेमका करतोय काय? : राज ठाकरे
 • बसवलेला मुख्यमंत्री कधीच काही बोलू शकत नाही, स्वतःच्या हिंमतीवर बसलेला मुख्यमंत्री बोलू शकतो, आज आपल्या महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं जातंय, पण देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलू शकत नाहीत : राज ठाकरे
 • मोदी आणि अमित शाह ज्या पद्धतीने देशाला घेऊन जात आहे ती रशियाची पद्धत आहे, 8-10 लोक देश चालवतायेत, मोदी-शाहांचे गुलाम म्हणून तुम्हाला आयुष्यभर राहायचं आहे का? : राज ठाकरे
 • मोदी नेहमी संबंध नसलेल्या गोष्टींचा उल्लेख करतात, त्यांचा इतिहास कच्चा आहे, भगतसिंह जेलमध्ये असताना नेहरू एकदा नाही तर दोनदा त्यांना भेटून आले होते, याची बातमी तेव्हाच्या ट्रिब्यून वर्तमानपत्रात आली होती : राज ठाकरे
 • मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत, तुमच्या कामाबद्दल कधी बोलणार? बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार? : राज ठाकरे
 • पुलवामातील शहीद जवानांच्या नावे मतं मागतायेत, ते काय निवडणुकीला उभे आहेत का? अभिनंदन निवडणुकीला उभा आहे का? : राज ठाकरे
 • योगी आदित्यनाथ म्हणाले देशाची सेना ही म्हणे मोदींची सेना आहे. आणि आज मोदी नव-मतदारांना आवाहन केलं की तुमचं पहिलं मत हे बालाकोटचा एअरस्ट्राईक करणाऱ्या सैन्यसाठी, पुलवामाच्या वीर शहिदांसाठी द्या. जवानांच्या नावावर मत मागताना लाज नाही वाटत? : राज ठाकरे
 • बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे पण नाहीत पण अमित शाह म्हणाले २५० माणसं मारली गेली. अमित शाहना कुठून मिळाला हा आकडा? : राज ठाकरे
 • मोदींनी युद्धसदृश्य स्थिती निर्माण केली, आमच्या देशाच्या सैन्यांवर आमचा विश्वास आहे : राज ठाकरे
 • मी 4 वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय : राज ठाकरे
 • नोटबंदीमुळे जवळपास 4 कोटी लोकांचा रोजगार गेला, हा अधिकृत आकडा आहे पण ह्या विषयावर मोदी बोलायला तयार नाहीत : राज ठाकरे
 • देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्रात एक लाख वीस हजार विहिरी खणल्या.. कुठे आहेत ह्या विहिरी? देशाने बहुमत देऊन देखील काम करायचं सोडून खोटं बोलत आहेत. आपल्या कामगिरीचा अहवाल द्यायचा सोडून सर्व विषयांवर बोलायला मोदींना वेळ आहे : राज ठाकरे
 • मराठवाड्यातील जनतेला माझं आवाहन आहे की पाण्याच्या परिस्थितीकडे गांभीर्याने बघा. सध्या मराठवाड्यात हजार हजार फूट खोल पाणी लागत नाहीये आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर मराठवडायचं वाळवंट होईल : राज ठाकरे
 • नरेंद्र मोदी नांदेडला येऊन गेले पण शेतकर्यांनबद्दल बोलले नाहीत. मोदी-फडणवीस सत्तेत आल्यापासून १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळामुळे गावच्या गावं विस्थापित होत आहेत. हे अच्छे दिन? : राज ठाकरे
 • नरेंद्र मोदींच्या सभेत म्हणे कोणी काळा शर्ट घालून आला तरी बाहेर काढत आहेत. पंतप्रधान काळ्या रंगाला का घाबरता? ह्याला कारण मोदी घाबरले आहेत, जे 2014 ला बोलले होते त्या पूर्ण करता आलं नाही म्हणून आता घाबरलेत : राज ठाकरे
Non Stop LIVE Update
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?