
मतदार यादीतील गोंधळ, लपवाछपवी या मुद्यावरून राज्यातील विरोधी पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, जंयत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी काल आणि आज सलग दोन दिवनस निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनेक प्रश्न मांडले. यानंतर आज वाय. बी.चव्हाण सेंटरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना या प्रमुख नेत्यांनी अनेक खुलासे, गौप्यस्फोट , आरोप करत निवडणूक आयोगाशी नेमकं काय बोलणं झालं तेही मांडलं.
मतदार यादीतील घोळ, त्यातील गायब झालेली नाव यावरूनही बरीच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.मतदारांची यादी गोपनीय असतेअसे सांगण्यात आले. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडमूक आयोगावर निशाणा साधला. मतदान गोपनीय असतं, यादी तुम्ही ऑनलाईन देता मग ते गोपनीय कसं? निवडणूक आयोग लपवाछपवी का करत आहे ? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
मतदारांची माहिती देता येत नाही…
अशोक पवार यांचा शिरूर तदार संघ आहे, त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं. घर क्रमांक एकच असणारे 188 मतदार दाखवण्यात आले, पण ते घरंच नाहीये गावात. त्यांसंबंधी लेखी तक्रार केली. पण तिथल्या निवडणूक प्रतिनिधीने सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते, म्हणून त्यांची माहिती देऊ शकत नसल्याचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले. कायदा काय सांगतो, मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची हे, त्यामुळे सदर मतदारांची व्यक्तीगत माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांच्या परवानगीशिवाय उपरोक्त माहिती पुरवता येत नाही, असंही सांगितल्याचं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
मतदार कोण हे आम्हाला कळू नये का ? राज ठाकरेंचा सवाल
मात्र हाच धागा पकड राज ठाकरे यांनी काही सडेतोड सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, ” केंद्रीय निवडमूक आयोग सांगतंय त्यातील एक गोष्ट मला समजली नाही की मतदारांची यादी गोपनीय असते. पण मला वाटतं मतदान गोपनीय असचं. आपण कुणाला मतदान करतोय ते गोपनीय असतं. यादी तुम्ही ऑनलाईन देता मग ते मतदार गोपनीय कसे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तिथे सीसीटीव्ही लावून तुम्ही पाहू शकता.ते तुम्ही पाहू शकता, मग आम्ही पाहू शकत नाही का ? निवडणूक आयोग यांना निवडणूक लढवायच्या नाहीत. आम्हाला लढवायच्या आहेत. मग मतदार कोण हे आम्हाला कळू नये का” असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी विचारले.
निवडणूक आयोग लपवाछपवी का करतोय ?
माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. निवडणूक आयोग लपवाछपवी का करत आहे? असंही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या याद्या आल्या. आता २०२२ ला फोटो सकट नावासकट सर्व याद्या आहेत. आताच्या याद्यातून फोटो काढले. आयोग असं का करतंय. पारदर्शकता आणलीय म्हणताय. मग असं का करत आहेत. घोळ कशाला घालत आहेत अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भूमिका मांडली.