Raj Thackeray Speech : बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि..गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या फक्त दोनच मागण्या, बस्स फक्त एवढच करा

Raj Thackeray Speech : ठाकरे बंधुंनी आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR प्रक्रियेविरोधात गर्जना मोर्चा काढला आहे. राज ठाकरेंनी यावेळी जोरदार भाषण केलं.

Raj Thackeray Speech : बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि..गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या फक्त दोनच मागण्या, बस्स फक्त एवढच करा
Raj Thackeray Speech
| Updated on: Oct 04, 2026 | 1:11 PM

ठाकरे बंधुंनी आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR प्रक्रियेविरोधात गर्जना मोर्चा काढला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण झालं. त्यांनी दोनच प्रमुख मागण्या केल्या. “एक म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली सर्वच्या सर्व SIR प्रक्रिया रद्द करा आणि दुसरी मागणी म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या” या दोन मागण्या राज ठाकरे यांनी केल्या. “आज मला दोन महत्वाचे विषय मांडायचे आहेत. पहिला विषय म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली एसआयआर प्रक्रिया संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे. त्यांनी मोदी सरकारमधील माजी केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांनी SIR बद्दल जे काय म्हटलय ते वाचून दाखवलं. SIR बेकायदेशीर आहे. कायद्यात तशी तरतूदच नाही. समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर अशावेळी एसआयआर केलं जाऊ शकतं. म्हणजे एसआयआर बेकायदेशीर आहे” असा दावा राज ठाकरे यांनी केला.

“विधानसभेच्यावेळी 40 ते 60 लाख मतदार वाढवायचे त्यातून तुम्ही सत्ता घ्यायची आणि SIR मधून आता 2 कोटी लोक बाहेर काढले. हे दोन कोटी लोक कोण होते?. हे आमचे मतदार होते का? कोण आहेत ते? म्हणून सर्व राजकीय पक्षांची मागणी आहे की, एसआयआर रद्द झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वोटिंग मशीन बंद झाली पाहिजे. बॅलेट पेपरवर मतदान घ्या. या दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. त्यानंतर सत्ता कोणाची का ना येवो, योग्य मार्गाने यईल” असं राज ठाकरे म्हणाले.

Loading...

‘नाही ऐकायचं आम्हाला’

“सत्ता उद्या दुसऱ्याची आली त्यावेळी तुम्ही काय कराल, आंदोलन करालं. नाही ऐकायचं आम्हाला. उद्या दुसरे पक्ष आले, त्यांनी दामदुपट्टीने यापेक्षा जास्त केलं, तर कुठे जाल?. आपण या देशाचा ढाचा बदलत आहोत. आपण या देशाचा ढाचा कोसळून टाकतोय” असं राज ठाकरे म्हणाले. “भविष्यात येणाऱ्या पिढ्यांनी कसं जगायचं, कशाही पद्धतीने सत्ता मिळवायची. आजचा मोर्चा त्या विरोधातला आहे. आज सर्व राजकीय पक्ष व्यासपीठावर बसलेत. सत्तेवरचा पक्ष व्यासपीठावर नाहीय. ज्या दिवशी तुम्ही विरोधी पक्षात जालं, दुसरे सत्तेवर येतील तेव्हा त्यांनी दामदुपट्टीने केलं तर काय करालं” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us