
तब्बल सव्वाशे वर्षं हिंद प्रांतावर राज्य करणारा आपाल महाराष्ट्र आह, मात्र आज आपल्या राज्याबद्दल बाहेर काय बोललं जात माहीत आहे का ? ही विकत घेणारी माणसं असं बोललं जातं. ही आपली प्रतिमा आहे असं म्हणत आपण शिवाजी महाराजांचे पुतळे कशासठी ठेवतो मग, फक्त डेकोरेशनसाठी? असा संतप्त सवाल विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला जागं होण्याची हाक दिली, तुम्ही जिवंत असलं पाहिजे. तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये. कुणाच्या आहारी जाऊ नका असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली. या मेळाव्यातील भाषणादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विविध विषयांना हात घालत सडेतोड भाषण केलं. तसंच त्यांनी सरकारला उद्देशून आव्हान देत त्यांनाही ललकारलं.
तेव्हाच अंगावर येऊ
महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन भरवलं जात असल्याची चर्चा आहे, त्यावरू राजल ठाकरेंनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. हे काय चालू आहे. केवळ गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी. त्यांची भांडणं व्हावी. त्यातून मतं कशी काढू शकतो, त्यासाठी काय काय करता येईल, यासाठीचे उद्योग आहेत. त्यांना वाटलं राज ठाकरे, संजय राऊत आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होऊ. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते करणार नाही, बिलकूल करणार नाही. जेव्हा समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय तेव्हा अंगावरच येऊ असा इशारा राज यांनी दिला.
कान बंद ठेवू नका. डोळेबंद ठेवू नका, आजूबाजूला काय चाललंय त्याकडे लक्ष द्या. तरुण आणि तरुणींनो लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात. तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय. तुमची भाषा निघून जाईल. कालांतराने पश्चात्तापाचा हात कपाळाला लागेल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. पैसे कमावले पाहिजे,. कुटुंब उभं केलं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून नाही असा सल्लाही त्यांनी महाराष्ट्रातील तरूणाईला दिला.
जेव्हा स्वाभिमान विकला जातो तेव्हा उरतात जिवंत प्रेतं
महाराष्ट्रातील जनतेला जिवंत राहण्याची हाक देतानाच राज ठाकरे यांनी त्यांना ठणकावलंही. ” बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल काय बोलतात माहीत आहे का. ही विकत घेणारी माणसं असं बोललं जातं. ही आपली प्रतिमा आहे. सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणारा महाराष्ट्र आहे. तो विकला जातो. माणसं विकली जातात. आपली जमीन आणि भाषा सोडतो. कशाला पुतळे ठेवतो शिवाजी महाराजांचे. डेकोरेशन म्हणून?” असा खड़ा सवाल त्यांनी विचारला. फारसी शब्द असू नये म्हणून स्वताचा राजकोष काढणारा माणूस, ज्याने मराठीत बोलायाला सांगितलं त्या महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमान आणि स्वत्व घालवत आहोत. जेव्हा स्वाभिमावन विकला जातो तेव्हा उरतात जिवंत प्रेतं असं ते म्हणाले. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे. त्यामुळे तुम्ही जिवंत असलं पाहिजे, तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये. कुणाच्या आहारी जाऊ नका असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.