Raj Thackeray | राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला; महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ पुण्यातून फुटणार, 15 डिसेंबरला MNS चा मेळावा

महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा पुढे ढकलला असून, त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ 15 डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे.

Raj Thackeray | राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला; महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ पुण्यातून फुटणार, 15 डिसेंबरला MNS चा मेळावा
राज ठाकरे

नाशिकः महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा पुढे ढकलला असून, त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ 15 डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे. या दौऱ्यात राज पश्चिम महाराष्ट्रात मनसेची मोट बांधणार असल्याचे समजते. ऐन महापालिका निवडणुकांवर राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे होऊ शकते का, हे पाहावे लागेल.

मुंबईत बैठक

राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. यावेळी उपशहराध्यक्ष, नगरसेवक आणि विभागप्रमुखांशी राज ठाकरे साधणार संवाद साधणार आहेत. त्यांच्या महाराष्ट्रत दौऱ्याची सुरुवात पुण्यातून होणार आहे. येथे 15 आणि 16 डिसेंबर रोजी मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात मनसेची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. त्या दृष्टीने या मेळाव्याला महत्त्व आहे, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

नाशिकमध्ये विशेष लक्ष

नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांनी अनेक फेरबदल केले आहेत. मात्र, अजूनही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू असतात. त्यामुळे पक्षाचे कार्यक्रम असो, बैठका असो, की पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश किंवा आंदोलने. एकमेकांना विश्वासात न घेताच त्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे राज ठाकरे यांनी यंदा नाशिकमध्ये विशेष लक्ष घातले आहे. यापूर्वीही त्यांनी नाशिक दौराही केला. त्यानंतर त्यांचे पुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अमेय खोपकर यांनीही दौरा केला आहे. आता राज ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्याने येती महापालिका निवडणूक रंगतदार होणार आहे.

फेब्रुवारीत निवडणुका

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Chhagan Bhujbal | महाराष्ट्राचे एक थेंब पाणीही गुजरातला जाऊ देणार नाही, मंत्री छगन भुजबळांचा निर्धार

Sharad Pawar| एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, पवारांकडून झिरवळांचे कौतुक; सत्ता येते-जाते, फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI