Raj Thackrey: मग एवढं वाटतंय तर त्या बायकांनी परदेशातून भारतात यावं… मोदी यांचा उल्लेख करत राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackrey Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ठाणे मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन करणाऱ्या महिलांबाबत एक विधान केले आहे.

Raj Thackrey: मग एवढं वाटतंय तर त्या बायकांनी परदेशातून भारतात यावं... मोदी यांचा उल्लेख करत राज ठाकरे असं का म्हणाले?
| Updated on: Sep 06, 2026 | 12:48 PM

Raj Thackrey Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ठाणे मेळाव्यात भाषण केले आहे. या भाषणात देशातील विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर रोखठोकपणे भाष्य केले. राज ठाकरे यांनी परदेशी रहिवाशी राहणाऱ्यां महिलांना आता टोला लगावला आहे.

ठाणे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले,” २०१८-१९ पासून ते आता २०२६ पर्यंत जे २५० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करु शकतात असे जे उद्योगपती होते असे जवळपास १३,००० उद्योगपती देश सोडून बाहेर गेलेत. भारतीय उद्योगपती देश सोडून बाहेर गेलेत, का बाहेर गेले? चीनमध्ये जेव्हा बाहेरुन शिकून ९६ टक्के पोरं त्यांच्या देशात जेव्हा परत येत आहेत, तेव्हा आमचे पंतप्रधान जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्या बायका येतात ना, क्राऊडमध्ये. त्या म्हणतात ना, मोदींनी पाहिला तर असं वाटलं की आम्ही देवालाच पाहिलं, असं म्हणत त्या बायका येतात ना.”

“एवढं जर तुम्हाला पंतप्रधानाविषयी वाटतंय ना, तर या ना तुम्ही देशात परत, जर समजा या देशात सर्व व्यवस्थित सुरु आहे, ७.८ टक्के जीडीपी ग्रॉथ गेला आहे. इतर देशांपेक्षा जास्त झाला आहे तर मग का राहतायं परदेशात? याना आपल्या देशात परत, इकडे यायचे नाव घेत नाही, इथून सगळे बाहेर जात आहे. शेतकऱ्याचीही तीच परिस्थिती आहे, देशातील शिक्षणाचीही तीच परिस्थिती, शेतकऱ्यांचा आकडा जर आपण पाहिला तर हैराण करणारा आहे, ४८ मिनिटाला एक आत्महत्या होते या देशात” असं राज ठाकरे यांनी या वेळेला भाषणात म्हटले.

“शेतकरी आत्महत्या करतायेत, शिक्षण घेणारी मुलं आत्महत्या करतायेत, काल आमच्या बाजूच्या इमारतीत वझे म्हणून कुटुंब राहतात, त्यांच्या १७-१८ वर्षाच्या पोराने आत्महत्या केली, आयुष्य संपवून टाकतायेत, हीच का देशाची चांगली परिस्थिती? आणि मला एकूण ज्या गोष्टी दिसतायेत समोर, तुम्ही काय नाग आहात का? नागपंचमीचे. विष काढलेले, दात काढलेले , तोंंड शिवलेले, समोरचे आपले बसलेत पुंगी घेऊन बसलेले, धर्माची आणि आम्ही मात्र डोलतोय.” असं म्हणतं राज ठाकरे यांनी सरकारवर आरोप केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us