AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीजेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी सुनावलं, थेट म्हणाले, कशाला पाहिजे डीजे डॉल्बी..

डीजेचा मुद्दा राज्यभरात गाजत आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी यावर भूमिका मांडली आहे. कशापद्धतीने सण साजरे झाले पाहिजे, हे त्यांनी सांगितले. यासोबतच सरकारवर टीका करताना राज ठाकरे दिसले.

डीजेच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी सुनावलं, थेट म्हणाले, कशाला पाहिजे डीजे डॉल्बी..
Raj Thackeray
| Updated on: Sep 06, 2026 | 12:43 PM
Share

पुण्यातील डिजेचा मुद्दा गाजत आहे. विद्यानंद बापट यांनी यावर आवाज उठवला. थेट tv9 मराठीसोबत बोलत असताना कॅमेऱ्यासमोर विद्यानंद बापट यांना मारहाण झाली. त्यानंतर राज्यातील नेत्यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावर बोलले आहेत. आज पुण्यात डीजेच्या विरोधात आंदोलन आहे. पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात विद्यानंद बापट सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, विद्यानंद बापट या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. आता डीजेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनीही भाष्य केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, सण साजरे करा… कशाला पाहिजे डीजे, डॉल्बी पारंपारीक सण नाही का साजरे करता येत? असा सवाल यादरम्यान राज ठाकरे यांनी केला. पारंपारीक पद्धतीने सण साजरे करा असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राने देशाला काय दिले आपण लोकांना किती गोष्टी शिकवल्यात. डिजेवर महिला नाचवण्याची संस्कृती ही उत्तरेची आहे. उत्तर भारतीयांचे आपण कशाला अनुकरण करतोय. आमचं लक्ष फक्त धर्माकडे आहे. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. डिजेच्या मुद्द्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे यांनी म्हटले की, अविनाश जाधवची दहिहंडी सर्वात उत्कृष्ट होती. रोज बोलण्यापेक्षा लिहिलेल बर. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंच्या रांगेत कोणीच बसू शकत नाही. सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो दुसऱ्या भिंतीवर असावा. राजकारण्यांचे फोटो लावा पण दुसऱ्या भिंतींवर. तुम्हाला गुंतवूण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.

धर्मावरुन वाद पेटवण्याचा वाद सुरु आहे. देशात सर्वत्र धर्माची झिंग आलेली आहे. काय चालले आहे कुठे चाललाय आपला देश. लोकांची माथी भडकवण्याची काम सुरु आहे. कुणी परदेशात जाऊ नये, असे मोदी परदेशातून सांगताय. GDP वाढला तर सोन का खरेदी करायचे नाही? देशाची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. उद्या पुर्ण देश रस्त्यावर येणार.

अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. 500 परदेशी कंपन्यांनी भारतातले कामकाज बंद केले. हिंदु मुस्लिमांनो सजग राहा.  गणेशोत्सव काळात दंगली होतील अशी मला माहिती मिळाली. सोशल मिडिया आता भाजपला भारी पडले. देशातले लाखो मुले, उद्योगपती परदेशात जाताय. भारतातून मुल जाताय ती परदेशात स्थाईक होताय.  13 हजार उद्योगपती देश सोडुन गेलेत. चीनमधून बाहेर गेलेली 96 टक्के मुल परत चीनमध्ये गेले. 48 मिनिटाला देशात एक शेतकरी जिवन संपवतोय. नवी मुंबईत हिंदी संमेलन होतंय. विद्यार्थी नैराश्यातुन जीवन संपवताय.

Follow Us
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
Manoj Jarange Patil | जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस; तब्येत आणखी खालावली, मात्र...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन...
बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन... संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?