AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : अनिशा माजगावकर यांना पक्षात घेताना राज ठाकरेंकडून खंत व्यक्त, प्रामाणिकपणे कबुली ‘जे झालं, ते चुकीचच’

Raj Thackeray : मनसे सोडून गेलेल्या महिला पदाधिकाऱ्याला पुन्हा पक्षात घेताना राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. प्रामाणिकपणे कबूल केलं की, 'जे झालं, ते चुकीचच'. राज ठाकरे असं का म्हणाले? त्याचा संदर्भ काय? समजून घ्या.

Raj Thackeray : अनिशा माजगावकर यांना पक्षात घेताना राज ठाकरेंकडून खंत व्यक्त, प्रामाणिकपणे कबुली 'जे झालं, ते चुकीचच'
Anisha Majgaonkar-Raj Thackeray
| Updated on: Aug 11, 2026 | 8:40 AM
Share

आज अनिशा माजगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या आहेत. भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मधून अनिशा माजगावर यांना निवडणूक लढवायची होती. पण ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली. त्यामुळे मनसेला ही जागा सोडावी लागली होती. त्यावेळी पालिका निवडणुकीत अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार राजोल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ‘भांडुपच्या जागेबाबत जे झालं, ते चुकीच झालं. मीही त्या जागेसाठी तेंव्हा आग्रही होतो’ असं मत राज ठाकरे यांनी अनिषा माजगावकर यांच्याशी बोलताना व्यक्त केलं. “भांडूपची ती जागा आपल्याला मिळाली असती तर आपण तिथेही जिंकलो असतो” अशी खंत राज ठाकरे यांनी अनिशा माजगावकरांना पक्षात पुन्हा सक्रिय करताना व्यक्त केली.

यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक पार पडली. प्रथमच उद्धव आणि राज या ठाकरे बंधुंनी एकत्र येत ही निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जवळपास 165 जागांवर उमेदवार उभे केले होते. तेच राज ठाकरे यांच्या मनसेला 52 जागा मिळाल्या. भांडूपच्या या जागेवरुन मनसे आणि उद्धव ठाकरे गटात मतभेद झालेले. पण युती धर्म पाळत मनसेने ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडली. त्यावेळी अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी केली. ठाकरे गटाने राजोल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी निवडणूक जिंकली. आता अनिशा माजगावकर पुन्हा मनसेमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.

तर राजोल पाटील यांना का पक्षात ठेवयाचं?

राजोल पाटील या खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या आहेत. याच संजय दीना पाटील यांनी बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या ज्या 6 खासदारांनी बंडखोरी केली, त्यात संजय दीना पाटीलही होते. वडिलांनी गद्दारी केली, तर राजोल पाटील यांना का पक्षात ठेवयाचं? अशी भांडूपच्या शिवसैनिकांची मागणी होती. पण राजोल पाटील तांत्रिकदृष्ट्या ठाकरे गटासोबतच आहेत. वडिलांनी बंड केलं, त्यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. आपण ठाकरे गटासोबतच आहोत असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण राजोल पाटील यांच्यापबद्दल एक अविश्वासाचं वातावरण आहे. आता अनिशा माजगावकर पुन्हा मनसेमध्ये सक्रीय झाल्याने पर्यायाने संजय पाटील यांच्यासमोरचं आव्हान वाढणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा