Eknath Shinde: कोल्हापूरात यड्रावकर-शिवसैनिक भिडले; बंडखोरीमुळे शिवसैनिकांनी आक्रमक होत पोस्टर फाडले

‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा देत शिवसैनिकांचा मोर्चा यड्रावकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Eknath Shinde: कोल्हापूरात यड्रावकर-शिवसैनिक भिडले; बंडखोरीमुळे शिवसैनिकांनी आक्रमक होत पोस्टर फाडले
महादेव कांबळे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 28, 2022 | 7:20 AM

कोल्हापूर : महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे आता राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्येही (Jaysingpur) या बंडखोरीचे पडसाद उमटले आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Minister of State for Health Rajendra Patil-Yadravkar) बंडखोरांच्या गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना-यड्रावकर गट समोरासमोर भिडल्याने मोठा राडा आज जयसिंगपूरात झाला. दोन्ही गटाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने जयसिंगपूरात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

 महिला पोलीस जखमी

बॅरिकेड्‌स तोडून यड्रावकरांच्या कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांकडून रोखण्यात आले. त्यावेळी मंत्री यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला फलक व त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा दिशादर्शक फलक शिवसैनिकांनी काढून टाकला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्या आहेत.

यड्रावकर यांच्या कार्यालयावर हल्लाबोल

बंडखोरी झाल्यामुळे शिंदे संतप्त शिवसैनिकांनी यड्रावकर यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावले होते, ते तोडून कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडविले. याचवेळी यड्रावकर गटाचे कार्यकर्ते व शिवसैनिक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.

उद्धव साहेब तुम आगे बढो…

‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा देत शिवसैनिकांचा मोर्चा यड्रावकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या समर्थनात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी यड्रावकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडविण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली.

बॅरिकेड्‌स तोडून हल्ला करण्याचा प्रयत्न

रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्‌स तोडून शिवसैनिकांनी यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलीस व शिवसैनिक यांच्यात शाब्दिक चकमक व झटापटही झाली. याचवेळी जवळच लावलेल्या यड्रावकर यांच्या फलकाची नासधूस करण्यात आली.

आम्ही यड्रावकरांसोबत

”आम्ही यड्रावकरांसोबत” असे फलक झळकल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि शिसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या झटपटीत महिला पोलीस जखमी झाल्या आहेत. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें