प्रादेशिक मनोरुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, Rajesh Tope यांचे आदेश

जालना येथील महत्त्वाकांक्षी प्रादेशिक मनोरुग्णालायाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करा. या रुग्णालयाचे भूमिपूजन येत्या 1 मे रोजी होईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, Rajesh Tope यांचे आदेश
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, Rajesh Tope यांचे आदेशImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 6:56 PM

जालना: जालना (jalna) येथील महत्त्वाकांक्षी प्रादेशिक मनोरुग्णालायाचे (regional mental hospital) काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करा. या रुग्णालयाचे भूमिपूजन येत्या 1 मे रोजी होईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आरोग्य विषयक विविध विषयांवर बैठक संपन्न झाली. त्यावेळी टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींसह बांधकाम विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जालना येथे बांधण्यात येणाऱ्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या मनोरुग्णालयाचे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण करावे. कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नये. रुग्णालय उभारण्याच्या टेंडरची प्रक्रिया अंतिम करुन येत्या 1 मे रोजी रुग्णालयाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यामध्ये दिरंगाई करु नये, असे निर्देश राजेश टोपे यांनी दिले. टोपे यांनी यावेळी रामनगर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामाचाही सविस्तर आढावा घेतला. ही कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

शासकीय रुग्णालयासाठी आराखडा

बैठकीच्या प्रारंभी जिल्हयातील मुख्य शासकीय रुग्णालयात रुग्णांना सुलभपणे वेळेत सुविधा मिळाव्यात, त्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी सिंगापूर आरोग्य विभागाच्या धर्तीवर ओसरा हेल्थच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते. रुग्ण रुग्णालयात प्रवेश करण्यापासून ते त्याला योग्य त्या सुविधा वेळेत मिळण्यासाठी पायाभूत सुविधांचा एक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार विशिष्ट प्रकाराचे सुचनांचे बोर्ड, रंगीत पटटया, गर्दीचे व्यवस्थापन योग्यरित्या हाताळण्यासाठी करावयाचे नियोजन, याशिवाय सुरक्षा या बाबींचा आराखडयात समावेश असल्याचे प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. जालना येथील सामान्य रुग्णालयात अशा पध्दतीच्या उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी बालमृत्यूच्या प्रमाणात घट होण्यासाठी आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण

दरम्यान, जालना येथे पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आले. जालना येथी नूतन पंचायत समितीची अत्यंत सुसज्ज व सर्व सोई-सुविधांनी युक्त अशी इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत राज्यासाठी आदर्श ठरावी, असे प्रतिपादन राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, महेंद्र पवार, अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, पुजा सपाटे, भास्कर आंबेकर, ए. जे.बोराडे, मनीष श्रीवास्तव, विमलताई पाखरे, पंडित भुतेकर, पांडूरंग डोंगरे, संतोष मोहिते, फेरोज लाला तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित बातम्या:

आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही, Bhagwat Karad पुड्या सोडत आहेत; अब्दुल सत्तार यांचा पलटवार

बीडचा बिहार झालाय हे आमदारांनी विधानसभेत सांगितलं, Pankaja Munde यांच्याकडून समाचार

रामराम, नमस्कार, आदाब, जय भीम करत जमवून घेतो, बाकीचे मंत्री बिडीला मोहताज; Abdul Sattarयांची तुफान फटकेबाजी

Non Stop LIVE Update
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.
वडिलांच्या त्या एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला,कोणता सांगितला किस्सा?
वडिलांच्या त्या एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला,कोणता सांगितला किस्सा?.
असे प्रश्न महिलांनाच का, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणींचा उलट सवाल?
असे प्रश्न महिलांनाच का, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणींचा उलट सवाल?.
'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई
'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई.
WITT : 'माझं मदिनाला जाणं म्हणजे...', स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य
WITT : 'माझं मदिनाला जाणं म्हणजे...', स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य.
अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या एमडींनी सांगितला 'X' फॅक्टर
अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या एमडींनी सांगितला 'X' फॅक्टर.
'जरांगेंचा बोलवता धनी कोण ? ही माहीती...,' संजय राऊत यांनी केली मागणी
'जरांगेंचा बोलवता धनी कोण ? ही माहीती...,' संजय राऊत यांनी केली मागणी.
दूध, घर किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स... स्टार्टअप्समुळे बदलतेय भारताची ओळख
दूध, घर किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स... स्टार्टअप्समुळे बदलतेय भारताची ओळख.