AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election: मतदानाच्या तांत्रिकबाबी सांगितल्याच नाही, काँग्रेस आमदाराचं बैठकीनंतर मोठं विधान

आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे चारही जागा आपण जिंकू. मात्र तांत्रिक बाबी सांगितल्या नाहीत, तसेच सत्तापिपासूस लोकांना दूर करायचं आहे आणि जिंकल्यानंतर पार्टी करायची आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.

Rajya Sabha Election: मतदानाच्या तांत्रिकबाबी सांगितल्याच नाही, काँग्रेस आमदाराचं बैठकीनंतर मोठं विधान
मतदानाच्या तांत्रिकबाबी सांगितल्याच नाही, काँग्रेस आमदाराचं बैठकीनंतर मोठं विधानImage Credit source: tv9
| Updated on: Jun 07, 2022 | 9:37 PM
Share

मुंबईत : आज मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची, आमदारांची आणि अपक्ष आमदार, मित्र पक्ष यांची बैठक (Mahavikas Aghadi Meeting) पार पडली आहे. या बैठीनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. राज्यसभेवर आलल्या चारही जागा निवडून जातील असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) व्यक्त केला आहे. तर या बैठकीत कोणत्याही तांत्रिक बाबी सांगितल्या नाही, असे विधान एका काँग्रेस (Congress) नेत्यांनं केलं आहे. या बैठकीत खरगे बोलले, पवार बोलले, सीएम बोलले. आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे चारही जागा आपण जिंकू. मात्र तांत्रिक बाबी सांगितल्या नाहीत, तसेच सत्तापिपासूस लोकांना दूर करायचं आहे आणि जिंकल्यानंतर पार्टी करायची आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री बैठकीनंतर काय म्हणाले?

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीचे चारी उमेदवार राज्यसभेत निवडून जाणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच एक परंपरा आपण पाळत आलो आहोत. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला हरकत नाही. 22-23वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती हे आठवावं लागतं. त्यामुळे सभ्यता पाळायाला हरकत नव्हती, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीनंतर म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

सर्वांना एकीचं आवाहन केलं. सर्व चारही उमेदवार निवडून येतील याची खात्री देतील. त्यांच्या विनंतीला चांगला प्रतिसाद देतील. छोट्या मोठ्या अडीअडचणी असतात त्या बसवून मिटवाव्यात असा सल्ला नेत्यांनी दिला आहे. नेत्यांनी जी विनंती केली त्याला प्रतिसाद मिळेल, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अजून काही बैठका होतील

आमच्याकडे चांगलं सख्याबल आहे. संख्याबळ नसताना भाजपने उमेदवार उभे केले. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणले आहेत. तसेच याबाबत अजून काही बैठका पार पडतील आणि आमदारांना सर्व रुपरेषा व्यवस्थित समजावून सांगितली जाईल, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण हे काही दिवस तरी गरमच राहणार आहे. एवढं मात्र नक्की.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.