AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बरं झालो शिर्डीत हरलो… रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; असं का म्हणाले?

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतील पराभवावर विनोदी टोलेबाजी केली. 'बरं झालं मी हरलो, नाहीतर काँग्रेससोबत राहावं लागलं असतं,' असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले. या पराभवामुळेच आपण शिवसेना-भाजपासोबत गेल्याचे ते म्हणाले. सांगलीतील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या टोलेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केले. काँग्रेसने आठवलेंसारख्या नेत्याला ताकद न दिल्याने पक्षाला मोठा फटका बसल्याचेही पाटील म्हणाले.

बरं झालो शिर्डीत हरलो... रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; असं का म्हणाले?
रामदास आठवलेंची टोलेबाजी
| Updated on: Apr 28, 2026 | 12:49 PM
Share

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्त्वाचे विधान केलं आहे. शिर्डीतील पराभवावरून त्यांनी हे विधान केलं आहे. मी काँग्रेस सोबत होतो. काँग्रेसने मला शिर्डीतून तिकीट दिलं. पण बरं झालं मी शिर्डीतून हरलो. नाहीतर आज मला काँग्रेससोबत राहावं लागलं असतं, असा चिमटा रामदास आठवले यांनी काढला. तसेच आपल्याला पाडण्यासाठी की जिंकण्यासाठी तिकीट दिलं हे आजवर मला कळलं नाही, अशी तुफान टोलेबाजीही त्यांनी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

सांगलीत सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी रामदास आठवले यांनी बिनधास्त टोलेबाजी केली. बरं झालं मी शिर्डीच्या लोकसभा निवडणुकीत हरलो, नाहीतर मला काँग्रेस सोबत राहावं लागलं असतं आणि मी बाहेरच असतो. आत जाता आलं नसतं, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्याला शिर्डीला बोलावलं, पण हरवण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी हे आपल्याला माहीत नव्हतं. मात्र काही प्रचारामुळे शिर्डीची निवडणूक हरल्यामुळे आपण शिवसेना भाजपासोबत गेलो, असं रामदास आठवले म्हणाले.

आठवले आणि पाटलांमध्ये टोलेबाजी

यावेळी रामदास आठवले आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत. त्यांना सगळया पक्षांनी मदत केली आहे. कोणी वरून केली तर कोणी आतून, असं आठवले म्हणाले. आठवलेंच्या या गुगलीवर विशाल पाटलांनीही षटकार लगावला. महिला विधेयका दरम्यान संसदेत रामदास आठवले यांना बोलू दिले नाही. पण ते बोलले असते तर कदाचित त्यांनी आम्हाला विधेयक समजून सांगितलं असतं. ज्यामुळे आम्ही प्रेरित होऊन चुकीचं बटन दाबू अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली होती, असा खोचक टोला खासदार विशाल पाटलांनी रामदास आठवलेंना लगावला.

आठवलें सारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली

यावेळी विशाल पाटलांनी आठवले यांचं कौतुकही केलं. रामदास आठवलें सारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली. त्यामुळे भाजपासोबत आठवले गेल्याने त्याचा मोठा राजकीय फटका काँग्रेसला भोगाव लागलाय, असं विधान विशाल पाटील यांनी केले. आठवले भाजपा सोबत गेल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसची मूळ वोट बँक दूर गेली. मनाची इच्छा नसताना आठवले हे भाजपा बरोबर गेले. कारण शिर्डीतल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आठवलेंचा पराभव झाला. पण तेच नेते आज भाजपात गेले, असा मिश्किल टोलाही पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचे नाव न घेता लगावला. यावेळी आठवलेंनी विशाल पाटलांना आपण गेल्याने ते आपल्या सोबत आल्याचे सांगितले.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं