मोठी बातमी! कदमांनी घेतली अनिल परब यांची भेट; चर्चेला उधाण

मोठी बातमी समोर येत आहे, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी आज अनिल परब यांची भेट घेतली आहे, या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! कदमांनी घेतली अनिल परब यांची भेट; चर्चेला उधाण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2025 | 4:20 PM

अनिल परब यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला होता. मुली ताब्यात घेतल्या होत्या. हा डान्सबार आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला होता. यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं. तसेच वाळू प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही परब यांनी योगेश कदम यांच्यावर केला होता. त्यानंतर रामदास कदम आणि योगेश कदम यांनी देखील परब यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी आज अनिल परब यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीबाबत सदानंद कदम यांना विचारले असता व्यावसायिक कारणांसाठी आपण परब यांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम आणि सदानंद कदम हे भाऊ आहेत. मात्र दोन्ही भावांमध्ये फारसं सख्य नाहीये, कदम बंधूंमध्ये आधीपासूनच विळ्या भोपळ्याचं नातं आहे. दरम्यान अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते, हे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं, विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. हे सर्व सुरू असतानाच सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतल्यानं आता चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हणाले कदम? 

सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीवर आता कदम यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. आपण व्यावसायिक कारणांसाठी आणि गणपतीसाठी परब यांची भेट घेतली. व्यावसायिक कारणांसाठी आम्ही महिन्यातून एकदा भेटतो, असं देखील यावेळी सदानंद कदम यांनी म्हटलं आहे.