
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल अत्यंत गंभीर आरोप केली. हेच नाही तर या वादात त्यांनी शरद पवार यांना देखील ओढले. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब यांनी रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला. रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी 1993 मध्ये जाळून घेतले होते की, जाळले होते, याचा तपास करा, असे त्यांनी थेट म्हटले. आता पुन्हा एकदा रामदास कदम यांनी आरोप केले असून सीबीआय चाैकशीची मागणी केली. अनिल परब यांनी दावा केला की, बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ डॉक्टरांची एक मोठी टीम होती. मात्र, रामदास कदम यांनी स्पष्ट म्हटले की, अनिल परब हा धांदात खोटं बोलत आहे. शेवटची दोन दिवस कोणतीही टीम त्यांच्याजवळ नव्हती आणि बाळासाहेबांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते.
अनिल परबांनी म्हटले होते की, बाळासाहेबांसोबत डॉक्टरांची टीम होती. शेवटच्या दिवशी सर्व नेते आणि डॉक्टर जनतेसमोर गेले. हे धांदात खोटं आहे. अनिल परब खोटं बोलला. मी दाव्याने सांगतो, शेवटचे दोन दिवस बाळासाहेब दुसऱ्या माळ्यावर होते. तिथे कुणाला जाण्याची परवानगी नव्हती. हा म्हणतो असंख्य लोकं भेटत होते. तो खोटं बोलत आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.
पुढे रामदास कदम यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रेस समोर मी फक्त एकटा गेलो होतो. डॉक्टर कोणी नव्हते. मी फक्त एकटा गेलो. मला सांगितलं बाळासाहेब गेले जाहीर करा. मी गेलो. मी जाहीर केलं. कोणीही डॉक्टर नव्हते. हिंमत असेल तर अनिल परबने नावं सांगितली पाहिजे. चौकशी होईल त्यांची. डॉक्टरांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही. याचं उत्तर कोण देईन.
तुझा बाप देईन. अनिल परबने जे सांगितलं ते धांदात खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला. याची चौकशी व्हावी म्हटलं. तिथे कोणी डॉक्टर नव्हते. मी फक्त संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली तर चूक काय. तू का बोलतो. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. बापाच्या बाबतीत कुणी संशय निर्माण केला तर मुलाने बोललं पाहिजे. या दलालाला सांगितलं बोलायला, असेही रामदास कदम यांनी म्हटले.