महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आता फाशीची सजा? वाचा दिशा कायद्याचा मसुदा

इतकंच नाही तर महिलेला संभाषणातून त्रास दिल्यास 2 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 लाखाचा दंडाची तरतूद करण्यात येणार आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आता फाशीची सजा? वाचा दिशा कायद्याचा मसुदा
| Edited By: | Updated on: Dec 09, 2020 | 9:44 AM

मुंबई : राज्यात महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या दिशा कायद्यातला महत्त्वपूर्ण मसुदा समोर आला आहे. यामध्ये बलात्कारकर्त्याला फाशी आणि आजीवन कारावासाची तरदूर करण्यात आली आहे. यामध्ये अँसिड हल्ला अजामीनपात्र गुन्हा करण्याचा विधेयकात विचार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर महिलेला संभाषणातून त्रास दिल्यास 2 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1 लाखाचा दंडाची तरतूद करण्यात येणार आहे. (Rape or life imprisonment for the rapist an important draft of the disha Act)

मिळालेल्या माहितीनुसार, महिला अत्याचाराच्या प्रकरणात अवघ्या 30 दिवसात खटला पूर्ण करणार अशीही तरतूद या विधेयकात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. हिवाळी अधिवेशनात या काद्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशात ‘दिशा’ कायदा करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच नवा कायदा गालू केला जाईल असं ते म्हणाले होते. येत्या अधिवेशनात या कायद्याबाबत कार्यवाही केली जाईल, असं आश्वासनही देशमुख यांनी यावेळी दिले होते. (Rape or life imprisonment for the rapist an important draft of the disha Act)

इतर बातम्या –

आधी टिकटॉकवर ओळख, नंतर महिलेकडून मुलावर बलात्कार; प्रकार लक्षात येताच वडिलांची पोलिसात धाव

भायंदरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, दोन मॉडेलसह चार पीडित मुलींची सुटका

(Rape or life imprisonment for the rapist an important draft of the disha Act)