Sanjay Raut : पुढचं टार्गेट ठाणे, थेट एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन; संजय राऊत यांची घोषणा

नीट पेपरफुटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनी "तुमच्या दाढीला आग लागलीये" अशा शब्दांत शिंदेंना फटकारले. राऊत यांनी आता पुढचे आंदोलन ठाण्यात, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ, लुईसवाडी येथे करणार असल्याचे जाहीर करत ठाण्याला लक्ष्य केले आहे.

Sanjay Raut : पुढचं टार्गेट ठाणे, थेट एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन; संजय राऊत यांची घोषणा
संजय राऊतांचे शिंदेंवर टीकास्त्र
| Updated on: Jul 27, 2026 | 11:19 AM

नीट पेपरफुटीवरून जे आंदोलन झालं ते अराजकीय, नॉन-पॉलिटीकल होतं, पण ते पॉलिटीकल केलं गेलं. काही लोकं उकडून पण जंतरमंतरला गेले, पण त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं, त्यांना ठोकरलं, ते त्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते. पण विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे काही जण निराश झाले. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना , म्हणतात असा प्रकार आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंचं तिरंगा मार्च, काल झालेल्या जल्लोषावर टीका केली. मात्र यावरूनच आता शिवसेने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेत एकनाथ शिंदेंना सुनावलं. तुमच्या दाढीला लहान पोरांनी आग लावली. जंतरमंतरच्या पोरांनी आग लावली. दाढी अजून जळत आहे. गप्प राहा आता, असा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली. तसेच आमचा पुढला मुक्काम ठाण्यात आहे, लुईसवाडीला, तिथेच आंदोलन होणार, असंही सांगत राऊत यांनी थेट पुढटं टार्गेट स्पष्ट केलं.

राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर, जल्लोषावर एकनाथ शिंदे यांनी टीका केली. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना म्हणत शिंदेंनी त्यांना हिवलं. मात्र आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ आम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला असू. तुम्ही कुठे आहात? तुमच्या दाढीला लहान पोरांनी आग लावली. जंतरमंतरच्या पोरांनी आग लावली. दाढी अजून जळत आहे. धूर येतोय. खालून वरून. गप्प राहा आता. फार बेअब्रू झालीय’ असं म्हणत राूतांनी शिंदेंना फटकारलं.

आम्ही पहिल्या दिवसापासून या आंदोलनात आहोत मिस्टर मिंधे, तुम्ही कुठे आहात? आता आमचं नेक्सट्ट जे आहे, काल शिवाजी पार्कात झालं. तेच ठाण्यात होणार. आमचा पुढला मुक्काम ठाण्यात आहे. काल जे शिवाजी पार्कला झालं तसंच ठाण्यात करणार. आम्ही म्हणतो संयम पाळा, पण सगळ्या मुलांची इच्छा आहे, तिथल्या . झुरळांची इच्छा आहे, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ठाण्यात या म्हणतात, लुईसवाडीला, असं म्हणत राऊत यांनी शिंदेंना थेट इशारा दिला.

नव्या शिक्षणमंत्र्यांबद्दल काय म्हणाले राऊत ?

मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा शिक्षणाशी आणि या यंत्रणेशी किती संबंध आहे? नवीन विधेयकात लक्ष्यवेधी असं काही नाही. पेपर फोडणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा होती, फक्त दहा वर्षाची केली. आकडे बदलले आहेत. दंड वाढवला. फक्त आकडा वाढवला. या कायद्याचं मोदी सरकार किती पालन करेल. मिंधे, राज्यपाल, सभापती, सरन्यायाधीश कायद्याचं किती पालन करतील. आता प्रश्न कायद्याचा नाही. विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले. काठीला खिळे लावून. मुलींचा विनयभंग करणं हे आदेश कुणाचे होते? यावर आज संसदेत आम्ही सरकारला प्रश्न विचारणार आहोत, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us