AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते’, रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांच्या या पुस्तकावर राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला आहे.  

'संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते', रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 6:14 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांच्या या पुस्तकावर राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे? 

एखादं पुस्तक लिहिणं आणि त्या पुस्तकांमध्ये आपला जीवन परिचय, राजकीय जीवनात आणि आयुष्यात कोणत्या संकटांना तोंड दिलं, एवढ्या संकटाला तोंड देऊन मी इथपर्यंत कसा पोहोचलो. जे काही महान नेत्यांनी पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये हे नमूद असतं. परंतु एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहायचं असेल, तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही. असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांची भाषा, त्यांची बोली आणि त्यांचे हावभाव रोज सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रातील जनता पाहाते. कधीतरी परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिली नाही की आपण चांगलं बोलावं म्हणून. त्यामुळे त्यांनी त्यांचे जे काही अनुभव या पुस्तकात सांगितलेले आहेत, ते काही स्वातंत्र्य लढा लढून आलेले आणि जेलमध्ये नव्हते गेले. ते कोणत्या कारणामुळे जेलमध्ये गेले होते हे त्यांनी रोखठोकमध्ये लिहावं, त्यांनी जर असं म्हटलं असतं की मी देश सेवा करताना आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करताना जेलमध्ये गेलो, आणि मला असे अनुभव आले तर ती गोष्ट आम्ही मान्य केली असती, असा खोचक टोलाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना लगावला आहे.

 उद्धव ठाकरेंना टोला 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील पुन्हा एकदा डिवचलं आहे, 2019 च्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असं म्हणून युतीनं लोकांना मतं मागितले, त्यानंतर लोकांनी आम्हाला भरभरून मत दिले,  असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक युती केली, भाजपची साथ सोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असं दानवे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी