AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भाजपच्या अडचणी वाढणार, रवींद्र धंगेकरांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ, म्हणाले डान्सबारमधील महिलांना लखपती दीदी

पुणे महानगरपालिकेचा पैसा डान्सबारमध्ये उधळणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर रवींद्र धंगेकर यांनी हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचारी उमेदवारांना पुणेकर धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात भाजपच्या अडचणी वाढणार, रवींद्र धंगेकरांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ, म्हणाले डान्सबारमधील महिलांना लखपती दीदी
Ravindra Dhangekar
| Updated on: Jan 14, 2026 | 9:59 AM
Share

पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. पुणे महापालिका नि़वडणुकांची धामधूम सुरु असतानाच पुण्यात भ्रष्टाचाराच्या पैशावरून आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरून मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. त्यातच  शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर विशेषतः भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांवर पैसा, सत्ता आणि डान्सबार या त्रिसूत्रीवरून गंभीर आरोप केले आहेत. पुणेकरांच्या घामाचा पैसा महापालिकेतून लुटला गेला आणि तो आता डान्सबारमध्ये बारबालांवर उधळला जात आहे, असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे.

डान्सबारमधील महिलांना लखपती दीदी बनवत आहात का?

रवींद्र धंगेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान करण्याचा दावा केला. मात्र, त्यांचेच उमेदवार डान्सबारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत आहेत. हा कसला महिलांचा सन्मान? डान्सबारमध्ये पैसे उधळून तुम्ही तिथल्या महिलांना लखपती दीदी बनवत आहात का? असा खोचक सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे संस्कृतीच्या गप्पा मारतात. मग त्यांच्याच पक्षात ही अशी ‘पिलावळ’ कशी वाढतेय? या भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोकांमुळे पक्ष बदनाम होत आहे, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

आतून पालिकेची तिजोरी उकळण्याचे काम

संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील आता गप्प का? त्यांनी स्पष्ट करावे की भाजपमध्ये चारित्र्यहीन लोकांसाठी किती जागांचा कोटा आरक्षित आहे. हे लोक पुणेकरांशी गोड बोलतात, पण आतून पालिकेची तिजोरी उकळण्याचे काम करत आहेत. यांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे, असा सवाल धंगेकर यांनी केला आहे.

पुण्याच्या राजकीय संस्कृतीला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी पुणेकरांनी आता जागरूक होण्याची गरज आहे. पुणेकर दोन डोळ्यांनी हे सर्व पाहत आहेतच, पण आता त्यांनी मतदानाच्या माध्यमातून आपला तिसरा डोळा उघडला पाहिजे. ही पिलावळ जर अशीच वाढत गेली, तर पुण्याच्या संस्कृतीला मोठी बाधा येईल. त्यामुळे स्वाभिमानाचे आणि भ्रष्टाचारमुक्त पुण्यासाठी मतदान करा,” असे आवाहन धंगेकरांनी जनतेला केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या दाव्याची खिल्ली उडवली होती रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबतच हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो, असा आरोपही केला आहे. या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, आता भाजप आणि शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?