श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही… सूरदास यांचा खळबळजनक दावा

मोठी बातमी समोर येत आहे, इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी मोठा दावा केला आहे. श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल देखील मोठा दावा केला आहे.

श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही... सूरदास यांचा खळबळजनक दावा
सूरदास यांचा मोठा दावा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 20, 2026 | 10:29 AM

मोठी बातमी समोर येत आहे,  श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केला आहे. अजित पवार यांना देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती, असं सूरदास यांनी म्हटलं आहे. सूरदास यांच्या या नव्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले सूरदास ? 

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला होता, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर अजित पवार यांचं विमान उतरत असतानाच विमान थेट जमिनीवर कोसळलं, या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर आता इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी मोठा दावा केला आहे.  श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत,  असं सूरदास यांनी म्हटलं आहे. तसेच मी हा ग्रंथ अजित पवार यांना भेट दिला होता, आषाढी एकादशीच्या दिवशी मी हा ग्रंथ अजित पवार यांना आपण भेट दिला होता, हा ग्रंथ त्यांनी आवश्य वाचावा असं देखील मी त्यांना म्हटलो होतो. परंतु  त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल, अजित पवार यांच्यासोबत जी काही घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे, असं यावेळी सूरदास यांनी म्हटलं आहे. दरम्यान सूरदास यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता, निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीला जात होते. विमान बारामती विमानतळावर उतरत असतानाच पायलटने नियंत्रण गमावलं आणि विमान जमिनीवर कोसळलं, या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आता सूरदास यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. श्रीमद् भागवतामुळे अपघाती मृत्यू टळतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us