येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल, प्रशासनास सहकार्य करा, धनंजय मुंडेंचं आवाहन

अखेरीस बीडमध्ये येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल. तसेच इतर अडचणी दूर होतील, असे आश्वासन धनंजय मुंडेंनी दिले. (Remedivir injection available in two days)

येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल, प्रशासनास सहकार्य करा, धनंजय मुंडेंचं आवाहन
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Namrata Patil

|

Apr 19, 2021 | 6:50 AM

बीड : बीडमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे ऑक्सिजन रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच  यासह इतर अडचणी दूर होतील, असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं आहे. (Remedivir injection will be available in beed next two days Dhananjay Munde information)

बीडच्या कोरोना स्थितीवरुन राजकारण

बीडमथील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यामुळे वैद्यकीय सेवांवर ताण येत आहे. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ट्वीटरवॉर रंगले होते. यावेळी बहिण-भावामध्ये बीडच्या कोरोना स्थितीवरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते. यानंतर अखेरीस बीडमध्ये येत्या दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल. तसेच इतर अडचणी दूर होतील, असे आश्वासन धनंजय मुंडेंनी दिले.

दोन दिवसात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होईल

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दुसऱ्या लाटेत अधिक धोका वाढला असून जिल्हावासियांनी प्रशासनास सहकार्य करावं, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त नातेवाईकांची धावपळ उडते आहे. आज जिल्हा प्रशिक्षण केंद्राबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. मात्र रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता असली तरी येत्या दोन दिवसात हे इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

तसेच इतर अडचणी दूर होतील असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. तर बीडमध्ये 350 बेड वाढवले जाणार आहेत. त्याशिवाय लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू आहे. या बरोबरच अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 150 बेड वाढवणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय? 

राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं होतं.

“REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.  (Remedivir injection will be available in beed next two days Dhananjay Munde information)

धनंजय मुंडेंची टीका 

यानंतर धनंजय मुंडे यांनीही सलग सहा ट्वीट करत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर टीका केली होती. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केले होते.

पंकजा मुंडेंचा टोला

“राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला होता.

प्रितम मुंडेंचा पलटवार 

“धनंजय मुंडे यांनी स्वतः आत्मपरिक्षण करावं, त्यांच्या कामाची पाहणी करावी. मी जिल्ह्याची लोक प्रतिनिधी म्हणून कोठेही कमी पडणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. माझ्या आणि माझ्या लोकांच्या मते मी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतेय. आज जिल्ह्यात औषधांचा तटवडा आणि आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण या सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांनी बघण्याची आवश्यकता आहे. पंकजा मुंडे जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना बीडला कधीही काहीही कमी पडलं नाही. जिल्ह्याची झोळी फाटेल इतका निधी पंकजा मुंडेंनी आणला. कुठलाही निधी मिळवण्यात त्यावेळी बीड जिल्हा एक नंबरवर होता.” असे खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या. (Remedivir injection will be available in beed next two days Dhananjay Munde information)

संबंधित बातम्या : 

ताईसाहेब, राजकारण इतरत्र जरूर करा, पण… धनंजय मुंडेंचे सलग सहा ट्विट

बीडमध्ये कोरोना लसीचा तुटवडा, पंकजा मुंडे म्हणतात, सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

बीडच्या कोरोना स्थितीवर मुंडे भावा बहिणीत ट्विटरवॉर, आता पंकजा मुंडे म्हणतात, तुम्हाला हक्क आहेच भाऊ !

पालकमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावं, प्रीतम मुंडेंचा टोला, अचानक जिल्ह्यात आल्याने उशिरा शहाणपण, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें