AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी, 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी, 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर
ZP President Reservation
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 12, 2025 | 4:30 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे. कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागस प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड या ठिकाणी महिला मागस प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण

  1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)
  2. पालघर – अनुसुसूचित जमाती
  3. रायगड- सर्वसाधारण
  4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
  6. नाशिक -सर्वसाधारण
  7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  8. नंदूरबार-अनुसूचित जमाती
  9. जळगांव – सर्वसाधारण
  10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
  11. पुणे -सर्वसाधारण
  12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  13. सांगली – सर्वसाधारण (महिला)
  14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
  16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
  17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  18. बीड – अनुसूचित जाती (महिला)
  19. हिंगोली -अनुसूचित जाती
  20. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  21. धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  22. लातूर – सर्वसाधारण (महिला)
  23. अमरावती – सर्वसाधारण (महिला)
  24. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
  25. परभणी – अनुसूचित जाती
  26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
  27. बुलढाणा -सर्वसाधारण
  28. यवतमाळ सर्वसाधारण
  29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  30. वर्धा- अनुसूचित जाती
  31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
  33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
  34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांसह आता निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आयोगाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना आपापली रणनीती तयार करण्यास मदत होणार आहे. आता आगामी काळात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश