या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन
Sadabhau Khot on CJP Agitation: शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना आतंकवाद्याची उपमा दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संतापाची लाट उसळली आहे. काय म्हणाले सदाभाऊ खोत?

Sadabhau Khot on CJP Agitation: शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा दिली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याचे आवाहनही केले आहे. दिल्लीत 6 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहेत. तर 20 हून अधिक दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केले. त्यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात उपाचारासाठी नेले.
दिल्लीतील आंदोलन हे षडयंत्र- सदाभाऊ खोत
पेपरफुटीविरोधात दिल्लीत गोंधळ सुरू आहे, यात निश्चितच षडयंत्र आहे. दोषींना पकडले गेले आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे. दोषींना सोडणार नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. नीट उत्तीर्ण झाले ते ॲडमिशनसाठी धावपळ करत आहे. मात्र ज्यांचा संबंध नाही ते राजीनाम्याची मागणी करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा संबंध नाही, त्यांचा राजीनामा घेऊ नये असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले.
प्रकरण लावून धरलं चौकशीचे आदेश दिले. मात्र इंडिया आघाडी, मविआ केंद्र आणि राज्यातले सरकार आहे त्यांच्या विरोधात वातावरण तयार करत आहे. सातत्याने खोटे बोलत आहे. इंडिया मविआ म्हणते आमचा संबंध नाही. मात्र, एक ट्रोल आहे, जयंत पाटील यांचा ग्रुप चालवतो. संपूर्ण प्रकरण अशांतता माजवण्याचे प्रकरण राष्ट्रवादी करत आहे. आय लव्ह जयंत पाटील पेजवर देखील आंदोलनात तेल टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या
इंडिया आघाडी मविआ आंतकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने मुळीच घेऊ नये. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र आहेत, असे म्हणत सदाभाऊंनी आंदोलकांना आतंकवाद्यांची उपमा दिली आहे. या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने आता वाद पेटला आहे. त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे.
उद्यापासून कर्जमाफीला सुरुवात
उद्यापासून राजस्व अभियान राबवले जाणार आहे. उद्या देवाभाऊंचा वाढदिवस आणि अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. जनतेच्या समस्यांचे निराकरण केलं जाईल. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना पैसे देण्यास देखील सुरुवात करणार आहे. सरकारकडून जनतेच्या सेवेचा संदेश दिला जाणार आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.