AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Revati Sule And Sarang Lakhani: बॅडमिंटनपटू, न्यूयॉर्कमधून एमबीएची पदवी, विश्वराज ग्रुपमध्ये आणि…सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानीची नेटवर्थ किती?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांनी उद्योजक सारंग लखानीशी लग्नगाठ बांधली. तर सारंग लखानी नेमके कोण आहेत, तसेच त्यांची एकूण संपत्ती आणि शिक्षणाबद्दलची माहिती जाणून घ्या...

Revati Sule And Sarang Lakhani: बॅडमिंटनपटू, न्यूयॉर्कमधून एमबीएची पदवी, विश्वराज ग्रुपमध्ये आणि...सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानीची नेटवर्थ किती?
sarang lakhani net worth
| Updated on: Jun 22, 2026 | 4:01 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची नात, रेवती सुळे यांचे नुकतेच मुंबईत लग्न पार पडले. या लग्नाला अनेक प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावल्याने या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगदी राजकारणातील सर्व पक्षातील नेते तसेच क्रिकेटपटू ते बॉलिवूड सेलिब्रिटी सगळ्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले पाहायला मिळाले. रेवती सुळेचे लग्न सारंग लखानी यांच्याशी झाले आहे, जे विश्वराज ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंगचे वय सध्या अंदाजे 33 वर्षे आहे. पण सारंग लखानी नेमके कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती तसेच एकूण नेटवर्थ किती याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

सारंग यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

माध्यमांच्या वृत्तानुसार, सारंग लखानीने 2014 मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.कॉम पूर्ण केली. त्याने आयआयएम बंगळूर येथून मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. मे 2023 मध्ये त्याने न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली. वृत्तानुसार, तो एक चांगला बॅडमिंटनपटू देखील आहे. त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. सारंग लखानी हे गेल्या 8 वर्षांपासून ‘विश्वराज ग्रुप’मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळतात. यापूर्वी त्यांनी ‘मॉडर्न हायड्रोजन’ कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणूनही काम सांभाळले होते. रेवती सुळे या देखील ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या माजी विद्यार्थिनी आहेत. आता हे दोघे ही लग्न बंधनात अडकले आहेत.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्याशी विवाह सोहळा 20 जून रोजी पार पडला. हा विवाहसोहळा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील प्रसिद्ध जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक प्रमुख राजकारणी आणि उद्योगपतींनीही हजेरी लावली होती. जरी सारंग लखानी यांची एकूण संपत्ती सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेली नसली तरी, काही माध्यमांच्या वृत्तानुसार त्यांची एकूण संपत्ती 50 ते 80 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ते विश्वराज ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरकार्यरत असून अरुण लखानी यांचे वारसदार आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित
फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब...
Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात...
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान