Nana Patekar : शब्द थिजले, काळजावर वीज कोसळली..नाना पाटेकरांच्या निधनावर रितेश देशमुखची मनाला भिडणारी पोस्ट

नाना पाटेकरांच्या निधनावर रितेश देशमुखने भावुक पोस्ट केली आहे. रितेश देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. काही सिनेमात दोघांनी एकत्र काम केल्यातचेही देशमुख यांनी सांगितले.

Nana Patekar : शब्द थिजले, काळजावर वीज कोसळली..नाना पाटेकरांच्या निधनावर रितेश देशमुखची मनाला भिडणारी पोस्ट
Nana patekar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 9:32 AM

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. पाटेकरांनी पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर होते. परंतु नाना या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. नाना पाटेकरांच्या निधनावर अभिनेता रितेश देशमुखने मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने पाटेकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी सिनेमात अनेक भूमिका साकारल्या होत्या. सिनेमात काम करताना सामाजिक कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यायचे. त्यांनी ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमांतून अनेकांना मदत केली. नाना पाटेकर हे अनेकदा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायचे. शेतकऱ्यांनी आर्थिक कारणामुळे टोकाचा निर्णय घेऊ नये, यासाठी नाना पाटेकर सामाजिक उपक्रम हाती घेतले होते. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘खामोशी: द म्यूजिकल’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या विविध सिनेमातून नाना पाटेकर घराघरात पोहोचले.नाना पाटेकर हे अनेक अभिनेत्याचे मार्गदर्शक होते. रितेश देशमुखने देखील नाना पाटेकर यांच्यासोबत सिनेमात काम केलं आहे.

Loading...

 अभिनेता रितेश देशमुखची पोस्ट जशीच्या तशी..

आज शब्द थिजले आहेत, काळजावर जणू वीज कोसळली आहे.

नाना गेले… या एका वाक्याने मन सुन्न, निःशब्द झाले आहे.

तुम्ही अभिनयाचे आकाश होतात, ज्याला तुलनेची सीमा नव्हती.

तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात तुम्ही अढळ घर केले.

कधी पडद्यावरचा तेजस्वी नायक, कधी अंगावर शहारे आणणारा खलनायक, तर कधी गंभीर चेहऱ्यामागचा खट्याळ विनोद,

प्रत्येक रंग तुमच्या अभिनयात खुलून आला.

पडद्यावर तुम्ही हीरो होतात, पण पडद्यामागे त्याहूनही मोठे.

तुमच्या संस्थेतून वाहत राहिली माणुसकीची निरंतर धारा.

‘ब्लफमास्टर’ आणि ‘हाउसफुल ५’ मध्ये तुमच्यासोबत पडदा वाटून घेतला, हे माझे भाग्य.

पण एका मराठी चित्रपटात तुमच्यासोबत काम करणे,

ही अपूर्ण ओढ आयुष्यभर उरी राहील.

तुमचे बोल, तुमच्या गप्पा, पाठीवरची ती कौतुकाची थाप,

सोबत केलेले ते खळखळते हसू, ही माझी करी कमाई.

कुटुंबीयांना, आप्तेष्टांना आणि लाखो चाहत्यांना

माझी मनःपूर्वक सांत्वना.

खरच आज एका युगाचा अस्त झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us