Nashik | गोदाकाठी…नाशिकमध्ये आजपासून आगळावेगळा नदी महोत्सव!

नाशिकमध्ये आज बुधवार 15 डिसेंबरपासून नदी महोत्सवाला सुरुवात होत आहे. 21 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

Nashik | गोदाकाठी...नाशिकमध्ये आजपासून आगळावेगळा नदी महोत्सव!
गोदावरी नदी, नाशिक.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:05 AM

नाशिकः नाशिकमध्ये आज बुधवार 15 डिसेंबरपासून नदी महोत्सवाला सुरुवात होत आहे. 21 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य पुरातत्व विभाग आणि नाशिक इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात नागरिकांना गोदावरीचा इतिहास, गोदावरीच्या परिसराची माहिती मिळणार आहे. सोबतच वारसा फेरी, व्याख्याने अशा भरपूर कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.

आज वारसा फेरी…

नदी महोत्सवात पहिल्या दिवशी आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता गोदेची वारसा फेरी होणार आहे. रमेश पडवळ आणि देवांग जानी हे संयोजक व मार्गदर्शक आहेत. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची उपस्थिती राहणार आहे. रामकुंडासमोरील मामलेदार मंदिरासमोर हा कार्यक्रम होईल.

नदी संस्कृती…

गुरुवारी, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नदी संस्कृती या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी नदीच्या अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते या मार्गदर्शन करणार आहेत. सरकारवाडा येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोदाघाटचे नाशिक या विषयावर व्याख्यान रंगणार आहे. यावेळी डॉ. कैलास कमोद हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रमही सरकारवाड येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे.

गोदाकाठचे जीवन…

शनिवारी, 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता गोदाकाठचे जीवन या विषयावर व्याख्यान होईल. गाडगे महाराज धर्मशाळा येथे हा कार्यक्रम होणार आहे. प्रा. आनंद बोरा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता जल प्रदूषण या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी प्रा. व्ही. बी. गायकवाड हे मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे.

नाण्यांमधील नदी…

रविवारी, 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्राचीन नाण्यांमधील नदी या विषयवार चेतन राजापूरकर यांचे व्याख्यान होईल. सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी, 20 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिकची गोदावरी या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी गोदावरीच्या अभ्यासक डॉ. शिल्पा डहाके मार्गदर्शन करतील. सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवाचा समारोप…

मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी नदी महोत्सव या उपक्रमाचा समारोप होईल. यादिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर, कारणे आणि परिणाम या विषयावर व्याख्यान होईल. प्रा. प्रमोद हिरे यावेळी मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये होईल.

इतर बातम्याः

Raj Thackeray: सगळेच हात धुवून घेतायत, ST सारख्या जुन्या संस्थेला पुढे आणण्यासाठी राज ठाकरेंनी सांगितला उपाय!

Obc reservation : ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला पुन्हा ‘तारीख पे तारीख’, उद्या पुन्हा युक्तिवाद होणार

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....