अजितदादांच्या फोटोवर फुल्या मारल्या, अशोक खरातबद्दल सर्वात धक्कादायक दावा, रोहित पवारांच्या ट्वीटने खळबळ!
भोंदू अशोक खरातची रोज नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होत आहेत. असे असतानाच आता रोहित पवार यांनी राज्यात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. या दाव्यामुळे नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Ashok Kharat And Ajit Pawar : भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्याचे आर्थिक व्यवहार, त्याच्याशी संबंध असलेली माणसं आता सगळेच पोलिसांच्या रडारवर आहेत. जादूटोना, तंत्रमंत्राच्या मदतीने महिलांना जाळ्यात ओढून त्याने लैंगिक अत्याचार केले आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीमध्य रोज नवनवे खुलासे होत आहेत. असे असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पावर यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत अशोक खरातवर आरोप केले असून राज्यात खळबळ उडाली आहे.
अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या
रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर एक ट्वीट केले असून याच ट्वीटमध्ये त्यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? असे सवाल उपस्थित करत सहळं समोर येणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.
हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच…
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, अशीही मागणी त्यांनी केली.
जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 31, 2026
दरम्यान, आता रोहित पवार यांनी केलेल्या या ट्वीटमुळे राज्यात नवी खळबळ उडाली आहे. अशोक खरातने खरंच अजितदादांच्या फोटोवर फुली मारली होती का? हे सत्य असेल तर त्यामागचा हेतू काय होता? असे सवाल उपस्थित केले जात आहे.