AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अशोक खरातच्या अडचणी संपता-संपेना, आता थेट बायकोला होणार अटक

अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अटक होणार आहे. आता अशोक खरात प्रकरणात नेमकं काय झालं? जाणून घ्या...

मोठी बातमी! अशोक खरातच्या अडचणी संपता-संपेना, आता थेट बायकोला होणार अटक
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 4:54 PM
Share

सध्या राज्यात प्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. दररोज या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याच्या शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी महत्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह एकूण पाच जणांवर फसवणूक आणि सावकारकी (मनी लेंडिंग) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करण्यात आली. राहाता न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुख्य आरोपी अशोक खरात आधीच तुरुंगात

या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला आधीच अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आता त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर आरोपी अशोक तांबे यांना लवकरच अटक करण्याची तयारी केली आहे. या फसवणुकीत शिर्डी परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून, तपास अधिकाधिक वेगाने सुरू आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावे देखील लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने तपासात महत्वाची माहिती समोर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) सध्या या सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहे. सूत्रांच्या मते, SIT च्या तपासात आणखी काही गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे आणि गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशोक खरातला 1 एप्रिल पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. आणखी काही माहिती समोर येते का हे पाहण्यासाठी सर्व आतुर आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...