AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर स्वाभिमानाने बाहेर पडा; दुष्काळावरून रोहित पवारांचे कृषिमंत्री भरणेंना ओपन चॅलेंज

दुष्काळावरून रोहित पवारांचे कृषिमंत्री भरणेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. मदत करणे हातात नसेल तर स्वाभिमानाने बाहेर पडावे, असं चॅलेंज रोहित पवारांनी दिलं.

...तर स्वाभिमानाने बाहेर पडा; दुष्काळावरून रोहित पवारांचे कृषिमंत्री भरणेंना ओपन चॅलेंज
rohit pawar newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 1:07 PM
Share

महाराष्ट्र सरकारने विविध तालुक्यात कोरडा दुष्काळ घोषित केला आहे. राज्यातील एकूण 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने पंढरपूरमध्ये मोर्चा काढला. शरद पवार गटाने दुष्काळात सरसकट मदत करावी, या मागणीसाठी मोर्चा काढलाय. या मोर्चादरम्यान आमदार रोहित पवार यांनी दुष्काळ स्थितीवरून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनाच चॅलेंज दिले. तुमच्या हातात मदत करणे नसेल, तर स्वाभिमानाने बाहेर पडावे, असं चॅलेंज रोहित पवार यांनी मंत्री भरणे यांना दिलंय.

आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की, ‘आम्ही सातत्याने मागणी करतोय. तुम्ही पाच ऑक्टोबरचा मुहूर्त काढला होता. लोकांचा दबाव आला म्हणून दहा दिवस अगोदर किमान पंचनामे सुरू झाले. सत्तेतले लोक राजकारण करतात हे तुम्हाला दिसत नाही का? शेतकऱ्यांना आम्ही मदत करा म्हणतोय म्हणजे आम्ही राजकारण करतोय का? मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय सरसकट नुकसान झालंय. तर सरसकट मदत करा..ज्या पिकांचे नुकसान झाले, त्याला मोठा खर्च येतो. खर्च आधारित मदत गरजेची आहे. आम्ही लोकांना जो शब्द दिला, तो पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. आम्ही कोणतंही राजकारण करत नाही. कृषिमंत्र्यांच्या हातात जर मदत करणं नसेल. तर स्वाभिमानाने बाहेर पडा आणि आमच्यासोबत शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा’.

एसआयआर प्रक्रियेबाबत रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही उद्या अकरा वाजता मुंबईत या संदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहोत. देशात कशा पद्धतीने गोंधळ केला जातो, हे पुराव्यासह दाखवणार आहे’. तर निवडणूक आयोगाच्या विरोधात अभिजीत दिपकेंनी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, ‘निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संविधानाला बाहेर फेकून दिलंय. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या निवडणूका पुन्हा घेतल्या जाव्यात. आम्ही तर ही मागणी सातत्याने करत आहे. देशात मनमानी व्हावी, असा कारभार सरकारकडून सुरू आहे. देशात उद्या संविधान आणि आरक्षण राहणार नाही. भाजपचे देशात मनुवाद आणण्याचं स्वप्न आहे. हे आम्ही होवू देणार नाही’.

स्वीडनचे खासदार निला विखे यांचे अभिनंदन करत रोहित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात अनेक जण खासदार आमदार बनतात, मात्र दुसऱ्या देशात जाऊन जनतेचा विश्वास संपादित करणे हे सोपं नसतं. स्वीडनमध्ये माणुसकीला जास्त महत्व दिलं जातं. महाराष्ट्रात मात्र लोक माणुसकीला जास्त महत्व देताना बघत नाही, जातीवाद धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला जातो. आम्ही विचार बदलत नाही आणि पार्टी बदलत नाही, हा संदेश नीला विखे यांनी कोणाला दिला त्या लोकांनी त्याबाबतीत समजून घेतलं पाहिजे’.

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन