शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? रोहित पवारांनी एकाच वाक्यात विषय संपवला

रोहित पवार यांनी आगामी राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का, यावरही मोठं भाष्य केलं.

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? रोहित पवारांनी एकाच वाक्यात विषय संपवला
rohit pawar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 8:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राज्यातील राजकारण फिरलं आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले. राष्ट्रवादीतही उभी फूट पडून दोन पक्ष निर्माण झाले आहेत. सुनेत्रा पवारांचा पक्ष सत्तेत आहे. तर शरद पवारांचा पक्ष विरोधी पक्षात आहे. पक्ष फुटीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे. तर काही जण हा दावा फेटाळून लावत आहे. याचदरम्यान शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु ही चर्चा फेटाळून लावत काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्न नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार यांनी टीव्ही9 च्या ऑफिसमधील बाप्पाचे दर्शन केलं. त्यानंतर त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का, यावर रोहित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांची जी भूमिका असेल, ती माझी भूमिका असेल. पवारसाहेब कधीही भाजपबरोबर जाणार नाहीत. काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. एकत्र आलो तर मोठी ताकद निर्माण होईल. लोकांच्या मनात सरकारविरोधात खूप मोठा रोष आहे. आम्हाला सरकारला गुडघ्यावर आणायला दोन दिवसच लागतील. राहुल गांधी आणि माझ्यात विचारधारा आणि आक्रमकता याच्यात साम्य आहे. आज लोकांसाठी भूमिका घेणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात खूप अडचणी आहेत. आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आम्ही लढत आहोत. युवा असल्यामुळे मी जास्तच आक्रमक आहे. त्यामुळे कदाचित आमची जास्त चर्चा असावी’.

‘ विरोधक काय बोलतात याचे मला देणेघेणे नाही. माझ्यावर बोलायला त्यांना भाजपच्या केंद्रातील सिस्टिमने सांगितले आहे. हे त्यांनाही माहीत आहे की, रोहित पवार यांना कुठल्याही खोट्या गुन्ह्यात अडकवता येणार नाही. रोहित पवार एखाद्या मुद्द्यावर बोलतांना पुराव्यासकटच बोलतो. मी बोललं पुराव्यासकट सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांची थोडीशी अडचण झाली आहे. भाजपवाल्यांना त्यांचा मास्टर्स व्हाईसचे ऐकावे लागते. एमपीएससीचा मुद्दा आम्ही हाती घेतला. आम्ही पुण्यातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांशी बातचीत सुरु केली, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us