AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : कुणी तरी नेता काकीच्या खांद्यावर हात ठेवतो, स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा… रोहित पवार यांनी कुणाला भरला दम?

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत स्टेजवरील नेत्यांच्या अव्यवस्थित वर्तनावर आमदार रोहित पवारांनी सडकून टीका केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचा आदर राखण्याचे आवाहन त्यांनी केले. स्टेजवर गैरवर्तन सहन केले जाणार नाही, असा दमच रोहित पवारांनी भरला. तसेच, सुनेत्रा पवारांनी जपून राहावे, असा सल्लाही दिला.

Rohit Pawar : कुणी तरी नेता काकीच्या खांद्यावर हात ठेवतो, स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा... रोहित पवार यांनी कुणाला भरला दम?
रोहित पवार
| Updated on: Feb 28, 2026 | 8:33 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसची काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. तसेच पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र, कालच्या मिटिंगमध्ये स्टेजवर अव्यवस्थितपणा होता. बड्या नेत्यांचा मान राखला जात नव्हता. या अव्यवस्थितपणावरच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवला आहे. स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. सुनेत्रा काकींचा आदर ठेवा, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम भरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत. सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. महाराष्ट्र या चार नेत्यांना पाहत आहे. दादांचा या चार नेत्यांवर वचक होता. काकींनी कुठे बसायचं याची जागा ते ठरवत होतं. कुणी तरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. काकींचा आदर आहे. आदर ठेवा. सांभाळून वागा आणि सांभाळून बोला, असा दमच रोहित पवार यांनी भरला.

कोणत्या स्वप्नाबद्दल, माहीत नाही…

अजित पवार यांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करणार, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. अजित काका हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे होते. त्यांना आम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो. दादा नेहमी विकासाबाबत बोलायचं. महाराष्ट्र विकासात पुढे असला पाहिजे, असं दादा नेहमी म्हणायचे. त्या स्वप्नाबद्दल काकी बोलल्या की वेगळ्या स्वप्नाबद्दल बोलल्या हे माहीत नाही. पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यावरच अजितदादांच्या अपघाताची चौकशी होईल, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

काकींनी सांभाळून राहावं

राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अजितदादांपासून आम्हाला दूर ठेवलं, किमान सुनेत्रा वहिनींपासून तरी दूर ठेवू नका, असं ही आमदार महिला बोलताना दिसत आहे. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. एका आमदार महिलेने बोलून दाखवलं ते व्हिडिओत आलं. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एखाद्या आमदारालाच पक्षातील चार नेते दूर ठेवत असेल तर बाकीच्यांचं काय? दादा हे दादा असल्याने त्या गोष्टी होऊ देत नव्हते. त्यामुळे काकींनी सांभाळून राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...