AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात पर्दापण केलं आहे. पण त्याचवेळी त्यांच्यावर टीका सुद्धा सुरु झाली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या इमेजला मोठा फटका बसला आहे.

Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
Rupali chakankar
| Updated on: Aug 26, 2026 | 12:26 PM
Share

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात पर्दापण केलं आहे. पुण्यात द नाईन्स नावाने त्यांनी एक बार आणि रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चाना उधाण आलय. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कल्याणीनगर मधील पॉश भागात The Nines या नावाने हॉटेल सुरू केलं आहे.

मात्र या हॉटेलचं उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. “The Nines” या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा. हे कल्याणी नगर मधील प्रचंड मोठे रेस्टॉरंट 20000 स्क्वेअर फिट मध्ये बांधले आहे. 35 करोड रुपये आजची किंमतआहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली निलेश चाकणकर यांना सामान्य नागरिकाचा एकच प्रश्न?? बाई एवढी माया आली कुठून, एवढा पैसा करोडोंच्या घरातला कसा कधी मिळविला जरा आम्हाला सांगा ना बाई.वा वा छान राजकारणी दिसतायेत तिथे” असं संगीता तिवारी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इमेजला मोठा फटका बसला

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या इमेजला मोठा फटका बसला आहे. राजकारणात त्यांना मोठा धक्का बसला. रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद तसचं राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलं. त्यांचे अशोक खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो समोर आले होते. हा भोंदूबाबा अशोक खरात सध्या तुरुंगाची हवा खात आहे. त्याच्यावर अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अशोक खरातवर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

कायदेशीर पावलं उचलली

दरम्यान या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर पावलं उचलली आहेत. रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप केले होते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...