AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकरणकर यांनी राजीनामा सोपवला आहे.

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं
Rupali Chakaankar ResignImage Credit source: Google
| Updated on: Mar 27, 2026 | 10:32 PM
Share

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला आहे. याआधी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आता त्यांनी राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला आहे.

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याबाबत एक पोस्ट केली आहे. याबाबत त्यांनी म्हटले की, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आला होता समोर

अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सध्या एसआयटीकडून त्याचा कसून तपास सुरु आहे. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरतही त्यांच्यावर टीका सुरूच होती. आता अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?