AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड मोर्चाबाबत जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक व्हॉट्सअ‍ॅप चॅट रुपाली ठोंबरे यांच्याकडून शेअर, म्हणाल्या, उत्तर दया जितेंद्र भाऊ…

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया...या कॅप्शनने स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे.

बीड मोर्चाबाबत जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक व्हॉट्सअ‍ॅप चॅट रुपाली ठोंबरे यांच्याकडून शेअर, म्हणाल्या, उत्तर दया जितेंद्र भाऊ...
रुपाली ठोंबरे पाटील, जितेंद्र आव्हाड
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 28, 2024 | 6:24 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी शनिवारी मोर्चा निघाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला. या मोर्चात सहभागी होण्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅप चॅट केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा त्यांनी X च्या माध्यमातून केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया…या कॅप्शनने स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे.

काय आहे त्या स्क्रीनशॉटमध्ये

उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज….मी पहिली तुझी भेट घेईन नंतर मोर्चाकडे जाईल… मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे काही असेल ते सगळे गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर. पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय..

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

बीडमधील मोर्चामधून बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, बीडच्या राजकारणाला कधी जातीचा स्पर्श झाला नाही. बीडचा सत्यानाश पोलिस प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांने केला आहे. या प्रकरणात आधीच अॅट्रसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला नसता. त्या वाल्मिकी कराडचा वाल्या झाला आहे. त्यामुळे त्याला वाल्या म्हणा.

दरम्यान, या शेअर चॅटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले, रुपाली ताई चांगल्या वकील आहेत. त्यांना इतके माहीत नाही की चॅट शेअर करणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या वकिली व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यांचे क्लॉयंट काय म्हणतील…, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

माझे ३.०७ ला भाषण संपले ३,.२६ ला हा चॅट आला. वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात, त्याची उत्तम निशानी आहे. मग कसे म्हणता की धनंजय मुंडे यांच्या मागे आम्हाला काही नाही करायचे.आखी टीम कामाला लागली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?