निवडणुका संपल्या, आता खरं राजकारण पुढं घडणार; सामनातून सूचक संकेत; पडद्यामागे काय सुरु?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर 'सामना' अग्रलेखातून खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. मुंबई अदानींच्या ताब्यात देण्यासाठीच भाजपने षडयंत्र रचले असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही यातून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोगावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील निवडणुका लोकशाही मार्गाने झालेल्या नाहीत. त्यात सत्ता आणि भ्रष्ट पैशांचा कहर झाला आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. विशेषतः मुंबईला अदानींच्या ताब्यात देण्यासाठीच भाजपने हे सर्व षडयंत्र रचल्याचा खळबळजनक आरोप सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.
मराठी अस्मितेचा पराभव आणि निवडणूक आयोगाची भूमिका
मुंबईसह 29 महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत. आतापर्यंत मुंबईत ठाकऱ्यांची म्हणजे शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेने मुंबईला 23 महापौर दिले. हे सर्व महापौर कडवट मराठी होते. आता ही परंपरा पुढे राखली जाईल काय? असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचे निकाल मुंबईत लागले. मराठी माणूस, मराठी अस्मितेचा पराभव एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, अमित साटम या मराठी माणसांनी घडवून आणला. पुन्हा निवडणूक आयोगाची त्यांना संपूर्ण साथ मिळाली. त्यामुळे या निवडणुका की निवडणूक आयोगाने केलेल्या नेमणुका असा प्रश्न पडतो, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे
Municipal Election 2026
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
भाजप व मिंधे गटाने काय करायचे बाकी ठेवले?
महाराष्ट्रात भाजपची लहर आहे असे त्यांचे लोक सांगतात, पण ही लहर नसून सत्ता आणि भ्रष्ट पैशांचा कहर आहे. या भ्रष्ट पैशांच्या जोरावर मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजप व मिंधे गटाने काय करायचे बाकी ठेवले? या निवडणुकीतही आयोगाने प्रचंड गोंधळ घातला. मराठी भागात मतदारांची नावे वगळली गेली. बोटावरची शाई पुसली जाईल याची व्यवस्था करण्यात आली. गणेश नाईक यांच्या सारख्या मंत्र्यांचे नावही वगळले गेले. अशा हजारो घटना होऊनही शेवटी मतदारांनी कर्तव्य बजावले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले ४० हजार कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कमिशन खोरीमुळे रद्द केला. शिंदे यांचा भ्रष्टाचार आणि पैसा गोळा करण्याची ‘हवस’ किती टोकाची आहे, हे फडणवीसांनीच उघड केल्याचा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
शिंदेंनी मुंबईत अदानींचा पाया भक्कम केला
भाजपचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्रासह भारत देश कसा गिळला आहे याचे जोरदार प्रेझेंटेशन राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत दाखवले तेव्हा देश हादरला. आतापर्यंत राहुल गांधी दिल्लीत व उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अदानींच्या राक्षसी वृत्तीवर प्रहार करत होते. राज ठाकरे यांनी अदानी यांनी व्यापलेला भारताचा व महाराष्ट्राचा नकाशा समोर आणला. भारताच्या संपूर्ण नकाशाचे मालक अदानी झाले. अदानी यांचे साम्राज्य मागच्या दहा वर्षांत फक्त नरेंद्र मोदींमुळे उभे राहिले. अदानी यांनी जे उद्योग उभे केले ते प्रतिस्पर्ध्यांच्या कानावर बंदुकीची नळी लावून. सर्व एअरपोर्ट, बंदरे, सार्वजनिक उद्योग त्यांनी ताब्यात घेतले ते मोदी यांच्या आशीर्वादाने. हा सर्व पैसा आला कोठून? असा सवालही सामनाने उपस्थित केला आहे. धारावीसह मुंबईतील मोक्याच्या जमिनी अदानींच्या घशात घालण्यासाठीच महाविकास आघाडी फोडण्यात आली. शिंदे यांनी आपला स्वाभिमान दिल्लीच्या दारात गहाण ठेवून मुंबईत अदानींचा पाया भक्कम केल्याची टीका अग्रलेखात आहे.
खरा राजकीय संघर्ष आता पुढेच सुरू होईल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या १९९९ मधील १०० कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल उघड करून भाजपचा खरा चेहरा समोर आणला आहे. भाजपने माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्याच सरकारमध्ये आहे, असे म्हणत अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांचा मुखवटा फाडला. शेवटी, मुंबईच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज ठाकरे) दिलेल्या झुंजार लढ्याचा इतिहास नव्याने लिहिला जाईल आणि निवडणुका संपल्या असल्या तरी खरा राजकीय संघर्ष आता पुढेच सुरू होईल, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.
