Video| कितीही करा हल्ला… लय मजबूत हाय बारामती किल्ला… मिशन बारामतीवरून भाजपाला ‘या’ नेत्याने सुनावलं…

बारामतीचे लोक रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे मजबूत लोक आहेत. त्यामुळे भाजपाने आणि निर्मला सीतारमणजी तुम्ही कितीही करा हल्ला.. लय मजबूत बारामती किल्ला हे आपण ध्यानात ठेवा, असा इशारा सचिन खरात यांनी दिलाय.

Video| कितीही करा हल्ला... लय मजबूत हाय बारामती किल्ला... मिशन बारामतीवरून भाजपाला या नेत्याने सुनावलं...
सचिन खरात, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) अध्यक्ष
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2022 | 10:47 AM

नाविद पठाण, पुणेः तुम्ही कितीही हल्ले करा पण बारामतीचा मबजूत आहे किल्ला, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिलाय.  मिशन बारामती असं टार्गेट ठेवत भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) जोरदार तयारी सुरु केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार (Sharad Pawar) घराण्याच्या बालेकिल्ल्यावरच भाजपने यंदा सर्व शक्ती पणाला लावली आहे. मात्र तुम्ही कितीही हल्ले करा, बारामतीचा किल्ला खूप मजबूत आहे, असे संकेत राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी दिले आहेत. ट्वविटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपाला हा इशारा दिला.

सचिन खरात ‘ आज भाजपाच्या नेत्या निर्मला सीतारामन पुण्यात आल्या आहेत. परंतु ज्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला त्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना पुण्यात येऊनसुद्धा वंदन केलं नाही, ही बाब अत्यंत चुकीचे आहे, अशी टीका खरात यांनी केली.

सचिन खरात पुढे म्हणाले, ‘ तुम्ही कितीही या भागाचा दौरा केला तरीही तुम्हाला या पुण्यातील जनतेने ओळखलं आहे. तसेच बारामतीचे लोक रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे मजबूत लोक आहेत. त्यामुळे भाजपाने आणि निर्मला सीतारमणजी तुम्ही कितीही करा हल्ला लय मजबूत बारामती किल्ला हे आपण ध्यानात ठेवा….

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या २२ सप्टेंबरपासून तीन दिवस बारामती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी बारामती मतदार संघातील विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा बारामती लोकसभा मतदार संघात कशा पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो, यासंदर्भात हा दौरा असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

अर्थमंत्र्यांचा हा दौरा राजकीय नाही, असंही काल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं. काल पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट इथं आयोजित एका कार्यक्रमात भाजप नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

ऐका सचिन खरात काय म्हणाले-