Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Sadabhau Khot Controversial Statement : "जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणतं. काल ही तरुण मुलं ही ग्रामीण भागातील मुलं होती. देशभरातून आलेली मुलं होती. शिक्षणासाठी लढणारी मुलं होती. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर तुम्ही फक्त देशभक्त. तुमचा भाजप फक्त देशभक्त दिसतो"

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO
Protesters vs Sadabhau Khot
| Updated on: Jul 21, 2026 | 12:24 PM

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. त्यावर आता या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी मुलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार आता कोणाला आतंकवादी बोलायचं शिल्लक राहिलेलं नाही. जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणतं. काल ही तरुण मुलं ही ग्रामीण भागातील मुलं होती. देशभरातून आलेली मुलं होती. शिक्षणासाठी लढणारी मुलं होती. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर तुम्ही फक्त देशभक्त. तुमचा भाजप फक्त देशभक्त दिसतो. बाकी सगळे लोक दहशतवादी वाटतात” अशा शब्दात या मुलांनी संताप व्यक्त केला. सदाभाऊ खोत यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. देशद्रोही म्हणणं म्हणजे त्या आमदाराची लायकी नाही. त्यांना रस्त्यात पकडून जाब विचारला पाहिजे. मत घेताना लाज वाटली नाही का? असा सवाल या मुलाने विचारला.

लोकशाही मार्गाने या आतंकवाद्यांना उत्तर दिलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी सदाभाऊ खोत यांची मागणी आहे. त्यावर एक मुलगा म्हणाला की, “खरंतर सदाभाऊ खोत यांना लाज वाटली पाहिजे. देशभरातून आलेली मुलं शांततेत आंदोलन करत होती. दहशतवादी असते तर सकाळी 9 वाजता बॅरिकेड तोडून गेले असते. लोकशाही मार्गाने चार वाजेपर्यंत बसून राहिले. पोलिसांनी लाठीचार्ज केला. यांना हिंदू-मुस्लिम सोडता काही येत नाही. सरकारविरोधात बोलले की आतंकवादी ठरवतात”

आमच्या एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात गुलाब होतं

“लोकशाही तुम्हाला माहित आहे का? काल आमच्या एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात गुलाब होतं. तुमच्या पोलिसांच्या एकाहातात लाठी आणि दुसऱ्या हातात बंदूक, रायफल होती. कुठल्या पद्धतीच्या लोकशाहीने उत्तर देणार आहात. आम्ही अहिंसा मानतो. आमची लोकशाही खऱ्या अर्थाने शांती, क्रांतीची भूमिका घेते. आम्ही कोणाला मारण्याचा प्रयत्न करत नाही” असं एक आंदोलक मुलगा म्हणाला.

Follow Us