निवडणुकीत जशी जनतेची करमणूक, तशीच आमचीही होतेय; सहा वर्षात सदाभाऊ खोतांनी शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मांडला नाही; राजू शेट्टींचा खोतांवर निशाना

| Updated on: Jun 13, 2022 | 8:55 PM

सगळ्यांची गंमत बघतो आहे, राजकारणातील घोडे बाजारही बघतो आहे. या निवडणुकीत जशी जनतेची करमणूक होते आहे तशीच आमची करमणूक होत आहे असं मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

निवडणुकीत जशी जनतेची करमणूक, तशीच आमचीही होतेय; सहा वर्षात सदाभाऊ खोतांनी शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मांडला नाही; राजू शेट्टींचा खोतांवर निशाना
गेल्या सहा वर्षात सदाभाऊ खोतांनी शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मांडला नाही
Follow us on

इचलकरंजी: राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Eelction) झाल्यानंतर आता साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेबाबत (Vidhan Parishad) आता सदाभाऊ खोत यांनी या निवडणुकीत आमचा काही रोल नाही म्हणत राजकीय वर्तुळात सगळ्या धक्का दिला आहे. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा (Swabhimani Shetkari Sanghtna) काही रोल नाही असेच त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी राज्यात राजकीय आखाडा अनेक घटनांनी गजबजून गेला होता. त्यानंतर आता होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे आणि उमेदवारीमुळे सध्या विधान परिषद चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षात सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मांडला नाही.

विविध घटना आणि वक्तव्य होत असतानाच, आणि सदाभाऊ खोत भाजपचाच एक भाग असतानाही त्यांनी इचलकरंजीमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की, विधानपरिषदेमध्ये कोणी माघार घेतली काय आणि कोणी लढवली काय याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

सगळ्यांची गंमत बघतो

राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यात घडलेले राजकीय नाट्य सगळ्यांनीच बघितले आहे. खासदार निवडणुकीवेळी आणि निवडीनंतर झालेल्या वेगवेगळ्या घटना घडमोडींनी राज्याचेच करमणूक झाल्याची परिस्थिती झाली. त्या अनुषंगाने सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले की, सगळ्यांची गंमत बघतो आहे, राजकारणातील घोडे बाजारही बघतो आहे. या निवडणुकीत जशी जनतेची करमणूक होते आहे तशीच आमची करमणूक होत आहे असं मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

सदाभाऊंनी 6 वर्षांत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही

अशी विविध मतं सदाभाऊ खोत यांनी मांडली असतानाच राजू शेट्टी यांनी सांगितले की, सदाभाऊ खोत यांनी 6 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मांडला नाही. त्यांनी जी काही भूमिका मांडली आहे ती त्यांनी पक्षाला धरून त्यांनी आपली भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.

चळवळीतील व्यक्ती निवडून येत नाहीत

यावेळी राजू शेट्टी यांनी राजकारण आणि शेतकऱ्यांविषयी मत मांडताना त्यांनी सांगितले की, चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्ती जोपर्यंत निवडून येत नाहीत, तो पर्यंत कोणीही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार नाही असे स्पष्ट मतंही त्यांनी यावेळी मांडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कोण मांडणार हा सवाल आहेच, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे कोणी नसल्यानेच जनतेनेही विचार करावा असंही त्यांनी सांगितले.

धनंजय महाडिक माझे चांगले मित्र

खासदार धनंजय महाडिक यांच्या राज्यसभेच्या निवडीनंतर काल कऱ्हाडमध्ये राजू शेट्टी यांचा आशिर्वाद घेतानाचा या दोघांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याविषयी माध्यमांनी त्यांना विचारताच ते म्हणाले की, धनंजय महाडिक हे माझे चांगले मित्र आहेत, ते कायमच सर्वांचा आदर करतात. त्यामुळे माझासारखा माणूस हा त्यांना फक्त शुभेच्छा देणार, माझ्याकडे काय मतदान नाही, काय नाही.

सगळ्या पक्षांपासून समान अंतरावर

सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी आणि आपल्या भूमिकेविषयी मत मांडताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, आम्ही आता सगळ्या पक्षांपासून समान अंतरावर आहोत. यावेळी त्यांनी भाजपविषयी मत व्यक्त करताना सांगितले की, भाजपची आताची भूमिका ही आहे की, कोणी काही तरी बोलले तर त्यांची घरे पडली जातात.

भाजपने शेतकऱ्यांचे 800 बळी घेतले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शेतकऱ्यांचे 800 बळी भाजपने घेतले आहेत, त्यामुळे भविष्यात भाजपबरोबर जाण्याचा काही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे.