AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना म्हणजे सुंदर स्त्री, गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे… माजी आमदाराचं बेताल विधान

Sadanand Chavan Controversial Statement About Shivsena : शिंदे गटाच्या नेत्याचं शिवसेना पक्षाबाबतचं विधान वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे गटाच्या नेत्याने स्वत : च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादात सापडलं आहे. वाचा सविस्तर...

शिवसेना म्हणजे सुंदर स्त्री, गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे... माजी आमदाराचं बेताल विधान
shivsenaImage Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Edited By: | Updated on: Oct 30, 2024 | 4:18 PM
Share

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणूक काळात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने स्वत : च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, असं विधान शिंदे गटाचे नेते सदानंद चव्हाण यांनी केलं आहे. सदानंद चव्हाण हे माजी आमदार आहेत. शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेची तुलना करताना वादग्रस्त विधान केलं आहे. लायसन्स आणि मंगळसूत्र नसल्यामुळे आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल, असं सदानंद चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सदानंद चव्हाण यांच्या विधानाने नवा वाद

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली नसल्यामुळे नाराज आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून नाराजी व्यक्त करताना शिवसेनेचा मंगळसूत्र नसलेली सुंदर स्त्री म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सदानंद चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

रत्नागिरीतील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. अजित पवार गटाकडून या जागेवर दावा सांगितला गेला. तर शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेसाठी प्रयत्न केले गेले. पण अखेर ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली. शेखर निकम यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे.

चिपळूणमध्ये महायुतीत नाराजीचा सूर

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे देखील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र शेखर निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चव्हाण नाराज झाले. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. या मतदारसंघात शिवसेनेची हक्काची मतं आहेत. तिथं आमचा उमेदवार निवडून येऊ शकत होता. पण ही जागा राष्ट्रवादीला गेली. त्यासाठी आम्ही नाराज आहोत. पण असं असेल तर महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना आमचा पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी झटून काम करणार आहे, असं सदानंद चव्हाण म्हणाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता